एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 8 September 2023 : मेष, मिथुन, कुंभसह 'या' राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 8 September 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 8 September 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीचे लोक आज आपल्या कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतील. तर, वृषभ राशीच्या लोकांना जोडीदाराचा पूर्ण सहकार्य मिळेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस थोडा सावधानतेचा असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका आणि जर केलीच असेल तर सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण दिवस तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आनंदात घालवाल. तुमच्या शेजारी काही किरकोळ वाद झाला तर तो आणखी वाढू देऊ नका. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून मन समाधानी राहील. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमची प्रकृती ठीक राहील.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही गोष्टीबद्दल तुमचे मन अस्वस्थ होऊ देऊ नका. कोणतेही काम शांततेने पूर्ण करा. ध्यान हा तुमच्यासाठी रामबाण उपाय असेल. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात आणू नका. तुमचे बिघडलेले कामही सकारात्मक विचारांनी करता येईल. नोकरीत तुमचे सहकारी आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, त्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. आज तुमच्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. कोणत्याही प्रकारचा निष्काळजी करू नका, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही धार्मिक प्रवासालाही जाऊ शकता. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा सावधानतेचा राहील. आज तुमचा आजूबाजूच्या किंवा इतर ठिकाणी एखाद्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही दिवसभर अस्वस्थ होऊ शकता, यामुळे तुमच्या स्वभावात मानसिक तणाव आणि चिडचिड देखील होऊ शकते. तुमच्या तब्येतीबद्दल गाफील राहू नका. जर तुम्ही जमीन किंवा कोणतेही घर, दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते खरेदी करण्यापूर्वी तुमच्या मोठ्यांचा सल्ला घ्या, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. कोणतेही काम करण्यासाठी घराबाहेर पडल्यास आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमची सर्व बिघडलेली कामेही पूर्ण होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचा तुमच्या पालकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी आव्हानात्मक असेल. आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुमचे मन शांत ठेवण्यासाठी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात.  मुलाच्या बाबतीत तुमचे मन समाधानी राहील. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचे कोणतेही काम करण्यापूर्वी घरातून बाहेर पडल्यास मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला जाईल. तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमचे अधिकारीही तुमच्या कामावर खुश असतील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही नवीन बदल करायचे असतील तर तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्या. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या घरी एक खास पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्या. आ तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून खूप सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पैशांच्या व्यवहारात तुम्ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत सावधानतेचा राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूने मन शांत राहील. ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. तुमची प्रकृती ठीक राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही सकारात्मक विचारांनी परिपूर्ण असाल. सकारात्मकतेमुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रम आयोजित करू शकता. आज एखाद्या जुन्या मित्राला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील मुलाच्या भविष्याबद्दल खूप काळजी वाटेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप मेहनत घ्यावी लागेल. तरच तुम्हाला यश मिळेल, आणि आर्थिक लाभही मिळेल. जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल.  ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकेल. भविष्याचा जास्त विचार करू नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक क्षेत्रात पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या कुटुंबात पाहुणे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्त कामामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल. तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल थोडेसे चिंतेत असाल. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आचा दिवस चांगला जाईल. आर्थिकदृष्ट्या तुमची स्थिती खूप मजबूत असेल. लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. ज्यामुळे तुमच्या घरात सुख आणि शांती नांदेल. आज तुम्हाला अचानक काही जुने रखडलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण खूप आनंदी असेल. तुम्ही तुमच्या घरात कोणतेही मोठे हवन, कीर्तन किंवा जागरण करू शकता. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप चांगला असेल. तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खूप फायदा होईल. अविवाहित लोकांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्याचा असेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर आनंदी राहतील. आज तुमच्या तब्येतीबाबउद्या तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम करू शकता. तुम्ही धार्मिक सहलीची योजना देखील बनवू शकता. मित्रांचं सहकार्य तुमचयासाठी मोलाचं ठरले. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे. मुलांच्या बाजूने तुमचे मन समाधानी राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या घराशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करा. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, त्यामुळे तुमचा दिवस खूप आनंदी जाईल. जर तुमच्या जमिनी किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात चालू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल, पण जोडीदाराच्या वागणुकीबद्दलही तुम्ही थोडे तणावात असाल. मुलांच्या बाजूनेही तुमचे मन थोडे चिंतेत असेल. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लहान भावंडांची आवश्यकता भासू शकते. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करण्याचा विचार करा. पैशांशी संबंधित तुमच्या कुटुंबातील एखाद्याशी तुमचे काही मतभेद होऊ शकतात. तुमचे कोणतेही जुने काम थांबले असेल, तर तुम्ही काम पुन्हा सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या लग्नाशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या भविष्याबद्दल तुम्ही थोडेसे चिंतेत असाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 7 September 2023 : मेष, मिथुन, तूळसह या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget