एक्स्प्लोर

Horoscope Today 31 May 2024 : मे महिन्याचा शेवटचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार लकी; वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 31 May 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 31 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्ही ऑफिसमध्ये परिस्थिती पाहून सर्वांशी वागा. उगाच गंभीर परिस्थितीत तुमच्या वागणुकीने तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. त्यामुळे जरा सावध व्हा.

व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक चांदीचा व्यापार करतायत त्यांचा व्यवसाय आज चांगला चालेल. आठवड्याची सुरुवात चांगली आहे. 

विद्यार्थी (Student) - जे विद्यार्थी परीक्षेचा मनापासून अभ्यास करतायत त्यांच्या आयुष्यात लवकरच मोठा बदल दिसून येणार आहे. तुमची आवड जपत राहा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला अॅसिडीटी त्रास होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे पोट देखील बिघडू शकतं. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)  

नोकरी (Job) - आज तुम्हाला शासनाच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात विचारणा केली जाऊ शकते. तुम्ही सर्व काम नीट समजून प्रामाणिकपणे करा. 

व्यवसाय (Business) - व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरचं वर्तन चांगलं ठेवावं. उगाच अरेरावीची  भाषा करू नये. 

तरूण (Youth) - तुमच्या आयुष्यात आता जे काही घडतंय त्याचा दोष इतरांना देऊ नका. अशा वेळी संयम बाळगा. हेही दिवस निघून जातील हा विश्वास मनात ठेवा.  

आरोग्य (Health) - आज तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो. काही कारणास्तव तुम्हाला आज बाहेरचं काम करावं लागेल. अशा वेळी आरोग्याची योग्य काळजी घ्या. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. सर्व कामे जबाबदारीने पार पाडाल. त्यामुळे बॉसही तुमच्यावर खुश असतील.   

व्यवसाय (Business) - हार्डवेयरचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. 

युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या भावा-बहिणीबरोबर काही शाब्दिक वाद होऊ शकतात. अशा वेळी वाणीवय नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - ज्यांना फीट्स येण्याचा त्रास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. हा त्रास पुन्हा येण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कर्क राशीसाठी चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम घडताना दिसून येतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. 

व्यवसाय (Business) - जर तुम्हाला एखाद्या नवीन योजनेची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. वातावरणात सकारात्मक बदल घडताना दिसतील. धार्मिक कार्यात मन गुंतलेलं असेल.

आरोग्य (Health) - कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात लगेच पॅनिक होऊ नका. डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवेल. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमच्या कामकाजात दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. अशा लोकांपासून सावध राहा.  तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्यायला शिका.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. 

विद्यार्थी (Student) - तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये तुमचं फार कौतुक होईल. 

आरोग्य (Health) - आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अन्यथा आजार जास्त वाढू शकतो.

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - फायनान्सच्या संबंधित क्षेत्रात आज चांगले बदल दिसून येतील. आठवड्याची सुरुवात चांगली जाईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायात प्रगती तर होईलच पण ती जपूनही ठेवता आली पाहिजे. 

कुटुंब (Family) - कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. अनेक सकारात्मक बदल दिसतील. 

आरोग्य (Health) - बाहेरचं अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतील. जसे की, पिंपल्स, बीपी, मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवतील. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरी, स्मार्ट वर्कमुळे तुम्हाला MNC कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, ती संधी हातून जाऊ देऊ नका. नोकरीत तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल.

व्यवसाय (Business) - ऑनलाईन मार्केटिंगमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांसाठीही हा काळ फलदायी ठरेल. कर्जाची परतफेड करताना व्यावसायिकांना काळजी घ्यावी लागेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आज अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. तुम्हाला फक्त स्मार्टनेस दाखवून अभ्यासाची गरज आहे. 

आरोग्य (Health) - तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या, तुम्ही होळीचा सण पूर्ण उत्साहात साजरा कराल. व्यायाम, योगासनं आणि प्राणायामसाठी नियमितपणे वेळ काढणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये प्रगती करण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल.  वैयक्तिक जीवनात आनंदाची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगलं फळ मिळेल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबतही चांगला वेळ घालवू शकता. विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतील.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील, तरीही आरोग्याची काळजी घ्या.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुम्हाला काम समजावून सांगतील. अनुभवी लोकांचा दीर्घकालीन अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

व्यवसाय (Business) - आज तुम्हाला व्यवसायात विशेष काही करता येणार नाही. ग्रहांच्या हालचाली लक्षात घेता, व्यवसायात उत्पन्न कमी निघण्याची स्थिती असू शकते. 

विद्यार्थी (Student) - प्रत्येक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. ग्रहण दोष निर्माण झाल्यामुळे नोकरदार लोक ऑफिसमध्ये काम करण्यात थोडा आळस दाखवू शकतात, ते काम करतील परंतु पूर्ण मनाने नाही.

व्यवसाय (Business) - गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. व्यावसायिकांना महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल, अपेक्षित कामं वेळेवर पूर्ण होतील.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. होळीच्या सणादरम्यान तुमच्या काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला त्रास देऊ शकतात.

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही अडकलेले पैसे मिळू शकतात.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. 

विद्यार्थी (Student) - उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे, तुम्हाला एखाद्या चांगल्या महाविद्यालयातून ऑफर मिळू शकते.

आरोग्य (Health) -आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 31 May 2024 : आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी प्रगतीचा; नोकरी-व्यवसायात मिळणार लाभच लाभ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget