Horoscope Today 30 November 2025: नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली! दिवसाची सुरूवातच मोठ्या लाभाने, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 30 November 2025: नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 30 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 30 नोव्हेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांना उत्कृष्ट कामाची ओढ आतूनच निर्माण होईल, कुटुंब वत्सल राहाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रकृतीच्या तक्रारी वारंवार जाणवतील, खांदेदुखी, गुडघेदुखी यावर औषध घ्यावे लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास करून घेऊ नये, व्यवसायात आधी काम सुरू करा, मग त्यात सुधारणा करता येईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टी भावनांच्या निकषावर घासून चालत नाहीत, याचा प्रत्यय येईल. काही बाबतीत व्यवहारही बघावा लागेल, आजूबाजूच्या जगात व्यवहारांमध्ये चौकसपणा ठेवला तर फायद्याचे ठरेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरुद्ध वागण्याचे विचार मनात येतील आणि ते अंमलातही आणाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी संशोधन क्षेत्रात चमकतील, आपले छंद गुप्तपणे जोपासण्याकडे कल राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरीमध्ये थोडी दोलायमान परिस्थिती निर्माण होऊ शकते, प्रकृती चांगली राहिली तरी डोक्यावर ताण येईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात उत्कर्षाच्या संधी येतील, मनापमानाच्या बाबतीत टोकाचे निर्णय घेतले जातील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज बुद्धीचा वापर जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे राहील, घरात तातडीची कामे निघतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीतील निष्काळजीपणा थोडा महागात पडेल, जवळच्या लोकांच्या बाबतीतील हट्टीपणा दुःखाला कारणीभूत होऊ शकतो
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रचंड मेहनतीच्या मानाने पूर्ण यश मिळत नसल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात वाढ करावी किंवा त्याला पूरक असा दुसरा व्यवसाय करावा का काय असा विचार मनात येईल.
हेही वाचा
Shani Margi: आजपासून 3 राशींनी कोणतीच गोष्ट हलक्यात घेऊ नका! कालच शनिने दिशा बदललीय, नोकरी-व्यवसायात अडथळे, पैसा अचानक जाण्याचे संकेत..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















