(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 30 August 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 30 August 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 30 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - जे मार्केटिंगच्या क्षेत्रात आहेत ते पुढील आठवड्यासाठी चांगला प्लॅन तयार करू शकतात. असे केल्याने तुमची कामे वेळेत पूर्ण होतील.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी पौष्टिक आहार घ्या. तरच तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील.
व्यापार (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगला नफा मिळेल. नवीन उत्पन्नाचे सोर्सेसही उपलब्ध होतील.
कुटुंब (Family) - आज तुमचा कुटुंबियांबरोबर वेळ अगदी आनंदात जाणार आहे. हा आनंदाचा क्षण तुमच्या नेहमी स्मरणात राहील.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांचा मूड बघूनच एखादा प्रस्ताव मांडा.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुम्हाला दिर्घकाळापासून सुरु असलेली दातदुखीची समस्या पुन्हा जाणवू शकते. अशा वेळी लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
व्यापार (Business) - जे व्यापारी परदेशात व्यापार करतायत. त्यांचा व्यवसाय चांगला नफ्यात जाणार आहे.
प्रेमसंबंध (Relationship) - कोणाच्याही सांगण्यावरून तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका. तुमच्या जोडीदारावरचा विश्वास किती आहे हे पाहण्याची वेळ आलीय.
मिथुन रास (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - शिक्षक पेशातील जे लोक आहेत त्यांना आज कामाच्या ठिकाणी दिवस फार आनंदात जाणार आहे. त्यामुळे कामातही तुमचं मन रमणार आहे.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शरीराला थोडा वेळ विश्रांती द्या. तुम्हाला पाण्याची अॅलर्जी सुद्धा होऊ शकते.
व्यापार (Business) - व्यापारी वर्गाचा दिवसही सामान्य राहणार आहे. कामात ना नफा ना तोटा ही परिस्थिती आज असेल.
कुटुंब (Family) - कधी कधी कुटुंबात शांतता राहावी यासाठी मौन धारण करणंच योग्य असतं. तुमची तीच वेळ आलीय असं समजा.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आज ऑफिसच्या कामात काळजी घ्या. तुमच्या कामात कोणतीही चूक करू नका, अन्यथा तुमचे अधिकारी तुम्हाला फटकारतील आणि तुमचे कामही निष्फळ होऊ शकते.
व्यवसाय (Business) - जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक घ्या, अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.
विद्यार्थी (Student) - छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू नका, अन्यथा तुमच्या कुटुंबात अडचणी येऊ शकतात.
आरोग्य (Health) - झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अस्वस्थ आणि गोंधळल्यासारखं वाटू शकतं.
सिंह रास (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गॉसिप करणाऱ्या लोकांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा ते तुमच्या वरिष्ठांना तुमच्याबद्दल देखील गॉसिप करू शकतात. त्यांच्यापासून सावध राहा.
व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतही काम करा, सर्व कामं एकट्याने करू नका. स्वतंत्र काम करण्याऐवजी जोडीदारावर काही जबाबदाऱ्या सोपवणं अधिक योग्य ठरेल.
विद्यार्थी (Student) - आज तुमच्या कुटुंबात खूप आनंद असेल, जास्तीत जास्त वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं, दैनंदिन दिनचर्येत नियमितता आणावी, जेवण वेळेवर करावं, अन्यथा तब्येत बिघडू शकते.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असाल तर तुमची खूप धांदल उडू शकते. पण तुमची मेहनत अजिबात वाया जाणार नाही.
व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या भागीदारासोबत तुमच्या व्यवसायाबाबत पारदर्शक असलं पाहिजे.
विद्यार्थी (Student) - तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कॉपी न करता तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर केला तर ते चांगलं होईल.
आरोग्य (Health) - जे लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करतात, त्यांनी डोळ्यांना थोडी विश्रांती द्यावी आणि शक्य असल्यास थंड पाण्याने डोळे धुत राहावे, अन्यथा डोळे दुखू शकतात.
तूळ रास (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - जे लोक कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार आहेत त्यांनी बॉसचे मार्गदर्शन घ्यावं. काम करणाऱ्या व्यक्तीने डेटा सुरक्षिततेवर देखील लक्ष दिलं पाहिजे.
व्यवसाय (Business) - वैद्यकीय, फार्मसी आणि सर्जिकल व्यवसायाशी संबंधित लोकांना वस्तूंचा पुरवठा करणं किंवा पैसे घेणं यासारख्या कामांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागू शकतं.
विद्यार्थी (Student) - नवीन पिढीला आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करून तुमच्या अपेक्षा पूर्ण कराल.
आरोग्य (Health) - मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल.
व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते मिटलेले दिसते, तुम्ही व्यवसाय हाताळण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता.
विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नवीन पिढी करिअरची काळजी करेल. आवडीचे काम करण्यासाठी वेळ मिळेल.
आरोग्य (Health) - किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. निष्काळजीपणामुळे हा आजार मोठा व्हायला वेळ लागणार नाही.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - नवीन करिअर सुरू करणाऱ्या लोकांनी कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करावं आणि इतरांकडून मिळालेल्या धड्यांचं पालन करावं.
व्यवसाय (Business) - धातू आणि औद्योगिक व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी हिशेबाच्या बाबतीत थोडे गोंधळलेले दिसू शकतात.
विद्यार्थी (Student) - नवीन पिढीने जाणकार लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या सल्लागारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती रागावली असेल तर त्याला शांत करण्यासाठी दिवस चांगला आहे.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. तुम्हाला सध्याच्या आजारांपासून लवकरच आराम मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी (Job) - ऑफिसमध्ये आज तुमचं कोणतंही काम सहजासहजी पूर्ण होणार नाही, आज तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध असलं पाहिजे. तुम्ही पैसे घेताना आणि देताना थोडं सावध व्हा.
विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची काळजी सतावेल. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये, हे समजणार नाही.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, तुम्हाला अशक्तपणाही जाणवू शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
नोकरी (Job) - आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं.
व्यवसाय (Business) - जे लोक त्यांचं घर, जमीन किंवा वस्तू भाड्याने देतात, त्यांच्यासाठी ते उत्पन्न हा एक चांगला पैशांचा स्त्रोत बनू शकतो.
विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील, अभ्यासात मन लागेल.
आरोग्य (Health) - आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून सामान्य असेल. आज तुम्हाला जास्त उत्साही वाटेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरी (Job) - काल तुमच्या कामाबाबत ज्या काही तक्रारी केल्या जात होत्या, त्या आज दूर होतील. आज ऑफिसच्या कामात तुमचं मन गुंतलेलं असेल.
व्यवसाय (Business) - जर व्यावसायिक लोक कोणतीही मालमत्ता विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करत असतील तर आजचा दिवस चांगला असेल.
विद्यार्थी (Student) - आज तुम्ही आईवडिलांची सेवा कराल. तुमच्या कुटुंबात शांततेचं वातावरण राहील.
आरोग्य (Health) - जर तुम्ही पाय आणि सांधेदुखीने त्रस्त असाल तर तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. तुम्ही तेल लावून थोडी मालिश करा, यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: