Horoscope Today 30 August 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास! 'या' राशींना चौफेर धनलाभाचे संकेत, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 August 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
![Horoscope Today 30 August 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास! 'या' राशींना चौफेर धनलाभाचे संकेत, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य Horoscope Today 30 August 2024 aajche rashi bhavishya astrological prediction zodiac sign in marathi rashibhavishya shravan 2024 astrology Horoscope Today 30 August 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास! 'या' राशींना चौफेर धनलाभाचे संकेत, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/fc09f90e477f5b6711b7b7ce0de7f3051724922782744358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Horoscope Today 30 August 2024 : पंचांगानुसार, आज 30 ऑगस्ट 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आपल्या व्यासंगाचा उपयोग करून उत्तम समय सूचकता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर काम पूर्ण कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र ठराल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामामध्ये शिस्त दिसेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ही मन लक्षात ठेवून त्याप्रमाणे आजची वागणूक ठेवा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
लेखक कवी पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त राहण्याचा योग आहे.
तूळ रास (Libra Horoscope Today)
महिलांनी कडक बोलणे टाळावे. कौटुंबिक सौख्या बाबत तडजोड करावी लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
अत्यंत शिस्तीने आणि धोरणी पणाने कामाचे नियोजन करावे लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कुठेही मतभेद झाले तरी समजुतीचे धोरण ठेवावे लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
काहीतरी नवीन करण्याच्या नादात मूळ काम बिघडत नाही ना याचा विचार आवश्य करावा लागेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
थोडा दूरदर्शीपणा ठेवल्यास फायदा होईल. सूचक स्वप्ने पडतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हे ही वाचा :
Shani Pradosh Vrat 2024 : शनी प्रदोष व्रताच्या दिवशी करा 'हे' उपाय; भगवान शंकराच्या आशीर्वादाने सर्व संकटांपासून मिळेल मुक्ती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)