एक्स्प्लोर

Horoscope Today 20 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा आहे आजचा शनिवार? राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 20 May 2023 : आज मेष आणि मीन राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. कसा राहील इतर राशींसाठी शनिवार? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 May 2023 : आज शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना सुख आणि समृद्धी मिळेल. या दिवशी कोणत्या राशीचं भाग्य उजळेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवी जबाबदारी मिळू शकते. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत तणाव राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यामध्ये सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरु होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. राजकारणात यश मिळेल. आज वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील, ज्यामध्ये तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. आज व्यवसायासाठी थोडा संघर्ष आहे. नवीन व्यावसायिक संबंध दृढ होतील. तुम्हाला स्वतःसाठी काही खास करायचं असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदार लोक नोकरीत बढतीच्या दिशेने वाटचाल करतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल आणि पोस्टमध्ये वाढ होईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांना आज नोकरी बदलीसंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. स्पर्धेत पुढे राहा. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा तसेच तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्ही कौटुंबिक कामात व्यस्त असाल. घराची सजावट आणि दुरुस्तीवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन कराराचा फायदा होईल. मानसिकदृष्ट्या खूप हलके वाटेल. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. उद्या एखाद्या मित्रामुळे तुम्ही अडचणीत येण्याचे टाळू शकाल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहिल. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल, परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जीवनशैलीच्या वस्तूंकडे कल वाढेल, त्यामुळे जास्त खर्च होईल. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना उद्या नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमचे स्थानही वाढेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला जाणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. कटू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात इच्छित नफा मिळाल्यानंतर ते खूप आनंदी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करु शकता. खर्च आणि गुंतवणूक वाढत राहतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. लोकांकडून प्रशंसा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना यश मिळेल. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायात लाभ होईल. आळशीपणामुळे तुम्ही तुमची कामे उद्यावर ढकलू शकता. तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांबरोबर शेअर करा. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. आज धार्मिक स्थळांना भेट द्या. तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला राजकारणात यश मिळेल. तरूणांसाठी आज त्यांचे प्रेम जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमँटिक डिनरवर जाल. व्यवसाय करणारे लोक देखील व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची शक्यता आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. आज तुम्हाला पैशांची बचत करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज नवीन पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमचे रखडेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला नातेवाईक किंवा मित्र मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकतील. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही घर, शॉप, किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर आज चांगला योग आहे. आरोग्य चांगले राहील. मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवा जेणेकरून येणाऱ्या काळात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. आज स्वतःसाठी थोडी खरेदी करा. बऱ्याच दिवसांपासून तुमची दिनचर्या जर तीच असेल तर आज तुमच्या दिनचर्येत काही बदल करा त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 19 May 2023: मेष, सिंह, कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा; जाणून घेऊया 'या' 12 राशींचे राशीभविष्य 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget