Shani 2024 : शनीचा कुंभ राशीत होणार उदय; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, आर्थिक लाभाचेही योग
Shani Transit : शनि कुंभ राशीत राहूनच आपली चाल बदलत राहणार आहे. 25 मार्चला अस्त असलेल्या शनीचा उदय होईल, ज्यामुळे काही राशींना चांगला लाभ मिळेल.
Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रात, शनि (Shani) हा सर्वात कठोर आणि शक्तिशाली ग्रह म्हणून ओळखला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे आणि तो व्यक्तीच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम करतो. शनीचा उदय आणि अस्त होणं महत्त्वाचं मानलं जातं, कारण त्याचा सर्व राशीच्या लोकांवर अनुकूल किंवा प्रतिकूल पद्धतीने परिणाम होत असतो. या काळात काही राशीच्या लोकांना शनि शुभ परिणाम देतो, तर काही राशीच्या लोकांना अशुभ परिणाम देतो.
शनीचा उदय कधी होणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्यात शनिचा उदय होणार आहे. 25 मार्च 2024 रोजी शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे. तर, शनीच्या अस्तामुळे ज्यांना अडचणी येत होत्या, त्यांच्या अडचणी शनीच्या उदयानंतर संपतील. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. परंतु काही राशींसाठी शनि उदय खूप शुभ राहील आणि 25 मार्चपासून या राशींचे चांगले दिवस सुरू होतील. शनीच्या उदयाचा शुभ परिणाम नेमका कोणत्या राशींवर होणार? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
शनीचा कुंभ राशीत होणारा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. मित्राच्या मदतीने जीवनातील अडचणी दूर होऊ लागतील.
तूळ रास (Libra)
शनीची बदललेली चाल तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारी ठरेल. या राशीच्या लोकांची वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना संतती हवी आहे, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय शुभ राहील. शनीच्या उदयामुळे तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं आणि आनंदी होईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांना 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि आल्याने विशेष लाभ होऊ शकतो. या काळात तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू संपतील. तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्ही तुमच्या नोकरीतील सर्व कामं चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. या काळात परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. परंतु सर्व करताना आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :