Horoscope Today 16 October 2025: आजचा गुरूवार 'या' 6 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरूंच्या कृपेने शुभ वार्ता येण्याचे संकेत, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 16 October 2025: आजचा गुरूवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 16 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 16 ऑक्टोबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांना आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल, संवाद वाढेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना मनासारख्या क्षेत्रात प्रवेश मिळाल्यामुळे उत्साह वाढेल, महिला परिस्थितीनुसार आचरण ठेवतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज काही कारणामुळे स्वतःला थोडा त्रास करून घ्याल, विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तम ग्रहमान
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात लोकांच्या मनातील गुप्त गोष्टी जाणून घेण्यात यशस्वी व्हाल, महिला व्यवहारावर आधारलेल्या मैत्रीचा फायदा उठतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज मानसन्मानाचे प्रसंग आले तरी, आपला पराक्रम तुम्हाला सिद्ध करावा लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज प्रत्येक प्रसंगाचा शांतचित्ताने विचार करावा लागेल, भावना कर्तव्याला स्फूर्ती देईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज एखादी गोष्ट सहज हसण्यावारी घेऊन जाल, चाकोरी बाहेरील जबाबदारी अंगावर घ्याल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमचा पराक्रम सिद्ध करण्याच्या अनेक संधी येतील, नोकरीत बदल करायचा आहे, त्यांना नवीन नोकऱ्यांचे मार्ग दृष्टिक्षेपात येतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज येणारी संधी आहे, हे ओळखून सारासार विचार करून आज निर्णय घेऊन टाकावेत
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नवीन योजना मनामध्ये घेऊन कल्पकतेने त्याचा विचार कराल, यासाठी हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कर्तव्याशी प्रामाणिक राहा. म्हणजे सर्व प्रश्न आपोआप सुटतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज काही गोष्टींचा निर्णय तत्त्वज्ञानाच्या निसटत्या भूमीवर उभे राहून न घेता व्यवहाराने घ्या.
हेही वाचा :
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला मकर, मीनसह 'या' 3 राशींना जंबो लॉटरी! गुरू संक्रमण अन् कुबेराचा धनवर्षाव एकत्रच, पैसा येण्याचा मार्ग मोकळा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















