एक्स्प्लोर

Horoscope Today 15 July 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 15 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचा ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या वादातून बाहेर पडू शकता.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, व्यावसायिकांसाठी आजचा काळ कठीण असेल. आज तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला एकटं वाटू शकतं, तुम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला काही गंभीर आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा पगारही वाढू शकेल. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा.

विद्यार्थी (Student) - तरुणांना सोशल मीडियावर त्यांचे जुने मित्र भेटू शकतात, अचानक हे मित्र तुमच्या नजरेत आल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही त्यांच्याशी बोलाल. 

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला कानाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - जे लोक महत्त्वाचा डेटा हाताळतात त्यांना आज काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षितपणे ठेवावा लागेल. तुम्ही नोकरीत काही अडचणी आल्यास त्वरित वरिष्ठांशी बोला.

व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. परंतु थोडे हात-पाय हलवले तर तुमचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं, 

विद्यार्थी (Student) - तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.

आरोग्य (Health) - आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही रात्री उशिरा जेऊ नये, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) -  नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अधिक कामकाजाचा, तणावाचा असणार आहे. डोकं शांत ठेवून सगळी कामं करा. 

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो. 

तरूण (Youth) - ज्या तरूणांना सरकारी नोकरीची इच्छा आहे त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 

कुटुंब (Family) - कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठी गरजूंना दान करा. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - ग्रहांच्या स्थितीनुसार, ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. हीच वेळ आहे कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची. त्या दृष्टीने प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) -आज तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण फार वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल. 

व्यापार (Business) - जे शेअर मार्केटमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. काळजीपूर्वक पैशांची गुंतवणूक करा. 

तरूण (Youth) - आज तुमचा आत्मविश्वास काही ठिकाणी कमी पडू शकतो. अशा वेळी चिडचिड करू नका. शांत होऊन हनुमान चालिसेचा जप करा. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्ही कामात जरा सावधानतेनेच काम करा. कोणाशीही कोणत्याही प्रकारे गॉसिपिंग करू नका.

आरोग्य (Health) - तुमच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त करा. कारण बद्धकोष्ठतेच्या त्रासाने तुम्ही हैराण होऊ शकता. 

व्यापार (Business) - व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. आजच्या दिवशी कामात कदाचित समाधानकारक कमाई होणार नाही. पण, खचून जाऊ नका. 

कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणास्तव तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. तुमच्या बुद्धीने तुम्ही अनेक कामं पूर्ण कराल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं, कारण ग्रहण बदलल्यामुळे तुमच्या जीवनात कर्जाबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

विद्यार्थी (Student) - तुमच्या परीक्षा जवळ आल्या असतील तर तुम्ही परीक्षेची तयारी अधिक जोमाने करायला हवी.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे. 

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो, तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. बाकीच्यांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचं तर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतात. ग्राहकांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुमच्याकडे जेवढे ग्राहक असतील तेवढा तुमचा व्यवसाय उत्तम चालेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज त्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धीने या समस्यांवर सहजतेने मात कराल, आज तुमचा पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने खूप खर्च होऊ शकतो.

आरोग्य (Health) - आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज तुम्हाला ऑफिसला जाण्याचा फायदा मिळू शकतो. तसेच, तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ते तुमच्यावर खूश असतील आणि तुमचा पगार वाढवतील.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. आज तुम्ही जी कोणती डील कराल त्यात तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते, त्यामुळे अगदी क्षुल्लक समस्या असतानाही निष्काळजीपणा करू नका, उलट डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा तो तुमचा विश्वासघातही करू शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज टेक्नोलॉजीचा वापर करुन ऑफिसचं काम पूर्ण करा, असं केल्याने तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल. आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही आधी चर्चा करा आणि मगच नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, कारण तुमचा पार्टनर तुम्हाला पुढे फसवू शकतो. हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला असेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं, आज तुम्ही तुमचा शाळेचा गृहपाठ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून ओरडा पडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला तोंड करुन जेवायला बसू नये; व्हाल कर्जबाजारी, पाहा काय सांगते वास्तूशास्त्र....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVEMaharashtra Operation Lotus Special Report : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'? महाविकास आघाडीला धास्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Embed widget