Horoscope Today 09 October 2024 : वृश्चिक राशीवर आज कामाचा भार; तूळ, धनु राशीला अचानक धनलाभ, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 09 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 09 October 2024: आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
तूळ (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस तुमचा मान वाढवणारा आहे. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकता, जी तुमच्यासाठी चांगली असेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला तुमच्या कामात सहकार्य करतील. तुमचे काही नवीन संपर्क तुमच्यासोबत व्यवसायात चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. तुम्ही तुमच्या वडिलांना बाहेर कुठेतरी सहलीला घेऊन जाऊ शकता. तुमच्या मुलांच्या मनमानी वागण्यामुळे तुम्ही त्यांच्यावर रागवाल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक काम करण्याचा आहे. कोणत्याही वादापासून स्वतःला दूर ठेवलं तर बरं होईल. तुमच्या जोडीदाराला रागाच्या भरात काहीही बोलू नका, नाहीतर तुमच्या बोलण्याने त्याला/तिला वाईट वाटू शकतं. व्यवसायातही तुमचे काही शत्रू तुमचं नुकसान करण्याची एक संधी सोडणार नाहीत. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फलदायी ठरणार आहे. तुम्हाला काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल, जे तुमच्या व्यवसायात मोलाची भर घालतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन कुठेतरी बाहेर जाऊ शकता. तुम्ही तुमच्या कामात आळशी होऊ नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आरोग्य ठणठणीत राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :