Horoscope Today 09 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार बजरंगबलीची कृपा; मार्गात येणारे अडथळे होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 09 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 09 October 2024 : पंचांगानुसार, आज 09 ऑक्टोबर 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
स्थावर इस्टेटीसंबंधी प्रश्न रखडतील. महिला कुटुंबातील व्यक्तींसाठी कष्ट करण्यात धन्यता मानतील.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज कामाच्या वेळी फक्त कामच कराल. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
आज कामामध्ये उत्साह राहील. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
कोणताही लाभ पदरात पडण्यासाठी झगडावे लागेल.
सिंह (Leo Horoscope Today)
दुसऱ्यामधील अवगुण शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा विकास करण्यावर आज भर द्यावा.
कन्या (Virgo Horoscope Today)
उठसूठ दुसऱ्यावर टीका करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा असा ग्रहांचा संदेश आहे.
तूळ (Libra Horoscope Today)
आज थोडा हट्टीपणा वाढेल. त्यामुळे तोटा होण्याचा संभव आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
महिला कोणताही विरोध सहन करणार नाहीत. कोणत्याही अप्रिय गोष्टीसाठी चिडचिड नको.
धनु (Sagittarius Horoscope Today)
कोणतीही परिस्थिती आली तरी ती आज उमदेपणाने स्वीकार कराल.
मकर (Capricorn Horoscope Today)
आहे त्या परिस्थितीत बदल करण्याचा मार्ग पत्कराल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करीत राहाल.
मीन (Pisces Horoscope Today)
जोपर्यंत तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: