एक्स्प्लोर

Horoscope Today 09 August 2024 : आज नागपंचमीच्या दिवशी 'या' राशींवर नागदेवता होणार प्रसन्न; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 09 August 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या. 

Horoscope Today 09 August 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस शुक्रवार. श्रावणातील पंचमी तिथी असल्या कारणाने आज ठिकठिकाणी नागपंचमीचा (Nag Panchami सण साजरा केला जातोय. त्यानुसार, आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करणं गरजेचं आहे.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. 

व्यवसाय (Business) - आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.

युवक (Youth) - तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. 

व्यापार (Business) - आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. 

तरूण (Youth) - मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कर्क राशीसाठी चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम घडताना दिसून येतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. 

व्यवसाय (Business) - जर तुम्हाला एखाद्या नवीन योजनेची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. वातावरणात सकारात्मक बदल घडताना दिसतील. धार्मिक कार्यात मन गुंतलेलं असेल.

आरोग्य (Health) - कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात लगेच पॅनिक होऊ नका. डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवेल. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमच्या कामकाजात दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. अशा लोकांपासून सावध राहा.  तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्यायला शिका.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. 

विद्यार्थी (Student) - तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये तुमचं फार कौतुक होईल. 

आरोग्य (Health) - आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अन्यथा आजार जास्त वाढू शकतो.

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - फायनान्सच्या संबंधित क्षेत्रात आज चांगले बदल दिसून येतील. आठवड्याची सुरुवात चांगली जाईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायात प्रगती तर होईलच पण ती जपूनही ठेवता आली पाहिजे. 

कुटुंब (Family) - कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. अनेक सकारात्मक बदल दिसतील. 

आरोग्य (Health) - बाहेरचं अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतील. जसे की, पिंपल्स, बीपी, मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवतील. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. अधिकारीही तुमच्यावर खुश नसतील. 

व्यापारी (Business) - व्यापारी वर्गातील जे लोक आहेत त्यांनी आज आपल्या ग्राहकांबरोबर चांगला व्यवहार ठेवावा. अन्यथा तुमच्या व्यवहारात नुकसान होऊ शकतं. 

कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणामुळे तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तुम्ही हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना धार्मिक स्थळी घेऊन जा. 

आरोग्य (Health) - वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी जास्त दगदग करू नका. शक्य तितकी विश्रांती घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्या. ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवा. घरी त्याबाबत बोलू नका. अन्यथा कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. 

व्यापार (Business) - आज तुमची कामाच्या बाबतीत एखादी डील तुम्हाला अचानक कॅन्सल करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला तणावाचा सामनाही करावा लागेल. 

तरूण (Youth) - आज तुमचा तुमच्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. एकमेकांचे मतभेद असू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार जसे की, पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे आजच्या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन टाळलं तर बरं होईल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट कळत नसेल तर सहकाऱ्यांचं सहकार्य घ्या. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्ही तुमचा सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यात व्यस्त असाल. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स देखील मिळतील. 

महिला (Women) - महिलांनी आपल्या स्वभावातील रागीटपणा जरा कमी करावा. तसेच, जोडीदाराबरोबर वाद होत असतील तर ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठी अधूनमधून विश्रांती घ्या. तरंच तुम्हाला बरं वाटेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - आज ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - व्यापारात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. समाजात तुमचं कौतुक होईल. 

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला भूतकाळातील जुन्या गोष्टी आठवतील. या गोष्टी आठवून तुम्हाला भावूक व्हायला होईल. 

आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणाचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) -  आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल राहून काम करणं अपेक्षित आहे. अन्यथा लोक तुमच्या स्वभाचा गैरफायदा घेऊ शकतात.

व्यवसाय (Business) - आज तुमचे विरोधक तुमचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही त्यांच्या बोलण्यात फसू नका. 

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यास खूप उत्सुक असाल. आजचा दिवस तुम्ही मनासारखा जगाल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला अति तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - तुमची निर्णयक्षमता चांगली असल्या कारणाने कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय कंपनीसाठी लाभदायक ठरू शकतात. तुमची जिद्द आणि तुमचे विचार याचं ऑफिसमध्ये खूप कुतूहल असेल. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गेले अनेक दिवस तुमच्या ज्या कोर्ट-कचेऱ्या सुरु होत्या त्याला आज यश येणार आहे.

विद्यार्थी (Student) -  इतरांची जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही तुमच्याच कुटुंबीयांसाठी अडचणी निर्माण करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत ठणठणीत असणार आहे. फक्त कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Nag Panchami 2024 : श्रावणमासातील पहिला सण नागपंचमीचा! या निमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Ahilyanagar : दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
Indurikar Maharaj : महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget