एक्स्प्लोर

Horoscope Today 07 November 2024 : आज दत्तगुरुंचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार लकी; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 07 November 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 07 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-समृद्धीचा असणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. मात्र, तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्या कामात अडथळे आणू शकतो. त्यामुळे त्यापासून सावध राहा. तसेच, तुमचं एखादं काम पूर्ण होता-होता अटकू शकतं. त्यामुळे योग्य दिवस आणि योग्य वेळ काढून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता भासणार नाही. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. नोकरीच्या बाबतीत अनेक दिवसांपासून तुमची जी समस्या होती ती लवकरच दूर होईल. तसेच, तुम्ही चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल. तसेच, नातेसंबंध जपण्यासाठी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जे व्यवसायिक आहेत त्यांना आपल्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. कामानिमित्त तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. तसेच, लवकरच धार्मिक कार्यानिमित्त तुम्ही यात्रेला जाऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला पैशांची चणचण जाणवणार नाही. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. अन्यथा तुमचं बजेट कोलमडू शकतं. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात सुरु असलेल्या समस्या हळूहळू दूर होतील त्यामुळे संयम ठेवा. मुलांच्या करिअर बाबतीतही जास्त चिंता करु नका. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्यावर जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या कामात मित्रांचा सहभाग फार मोलाचा ठरणार आहे. तुम्ही आऊटिंगला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता. जर तुमचं अनेक दिवसांपासून एखादं काम थांबलं असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करु शकता. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

तूळ (Libra Today Horoscope) 

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत कामाचा ताण असेल, परंतु जास्त लोड घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्गाचा दिवस चांगला असेल. सणांचे दिवस येत असल्याने नफा होईल. तुमच्या परीक्षा सुरू असतील तर जोमाने अभ्यास करा, तरच अपेक्षित यश मिळेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, ताप आणि घसादुखी तुम्हाला हैराण करू शकते.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचा आज कामाचा ताण खूप वाढू शकतो. बाकी लोकांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापारी वर्ग वस्तूंवर चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. ग्राहकांची संख्या लक्षणीय वाढेल, ज्यामुळे नफाही वाढेल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्यावर अभ्यासाचं ओझं असेल. काही कामासाठी पालकांकडून पैसे घेण्याची गरज पडेल. आजार किरकोळ आजार जाणवेल, थकवा जाणवेल.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरदार लोकांना आज लाभ होईल. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील, ते तुमच्यावर खूश होऊन काही चांगला निर्णय घेऊ शकतात. रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांचा हा काळ चांगला असेल. तुम्ही जी कोणती डील कराल त्यात चांगला नफा मिळू शकेल. तुम्ही आज अभ्यासात जास्त लक्ष द्यावं, अन्यथा परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांचा ओरडा मिळेल. आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा डोकेदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

मकर (Capricorn Today Horoscope)

आजचा दिवस तुमचाच आहे. कामात आज तुम्हाला चांगला लाभ होईल, सहकाऱ्यांचं सहकार्यही लाभेल. आज व्यवसायासाठी नशीब तुमच्या बाजूने असेल, तुम्हाला नफा मिळेल. जे काही काम हाती घ्याल त्यात नक्कीच यश मिळेल. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा विश्वासघात होऊ शकतो. तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी जिम लावा, योग करा. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)              

आजचा दिवस चांगला आहे. टेक्नोलॉजीचा मदतीने ऑफिसची कामं पूर्ण करा, वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या डील मिळू शकतात. तुम्हाला चांगली नफा मिळेल, नवीन ग्राहक जोडले जातील. विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचं ऐकावं, त्यांचा सल्ला घ्यावा, प्रगती होईल. आज तुमचं आरोग्य ठीक असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. 

मीन (Pisces Today Horoscope)

आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला चांगली मदत करतील, तुमच्यावर कामाचा अतिरिक्त भार असेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असील तर नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला असेल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे लक्ष द्यावं, अन्यथा तुम्हाला शिक्षकांकडून ओरडा पडेल. शरीर फिट ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 07 November 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Devendra Fadnavis Profile : बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री...  घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Oath Ceremony Update : एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्र देण्यासाठी राजभवनवर जाणारUday Samant PC Mumbaiएकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मंत्रिपद स्वीकारणार नाही-सामंतChampasingh Thapa on Eknath Shinde : शपथविधीपूर्वी चंपासिंह थापाची मोठी भूमिका, म्हणाले....Ekanth Shinde News : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही यावर संभ्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Devendra Fadnavis Profile : बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री...  घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
Ind Vs Aus 2nd Test : कॅप्टन रोहितचा प्लॅन समोर दिसताच ऑस्ट्रेलियाकडूनही मोठा फेरबदल! दोन तेजतर्रार गोलंदाजाची एन्ट्री
कॅप्टन रोहितचा प्लॅन समोर दिसताच ऑस्ट्रेलियाकडूनही मोठा फेरबदल! दोन तेजतर्रार गोलंदाजांची एन्ट्री
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
एकनाथ शिंदेंच्या मनात दुसरंच होतं, शपथविधीपूर्वी उदय सामंतांचं मोठं विधान
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Embed widget