(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 02 November 2024 : आज दिवाळी पाडवा! हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 02 November 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 02 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांना संपत्तीच्या बाबतीत अनुभवी लोकांचं सहकार्य मिळेल. त्यांच्या सहकार्याने तुमची सर्व कामं सहज सुटतील. नोकरदारांसाठी उत्तम दिवस आहे. जास्त कामामुळे वेळोवेळी चिडचिड होऊ शकते.
वृषभ (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. तसेच, आज सुट्टीच्या दिवशीही तुम्हाला ऑफिसची कामे करावी लागतील. लाभासाठी दिवस चांगला आहे.
मिथुन (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही इतरांशी कामाशी संबंधित गोपनीय बाबींवर चर्चा करण्याचे टाळाल. आर्थिक दृष्टिकोनातूनही दिवस अनुकूल आहे. व्यावसायिकांसाठी व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कमाईच्या चांगल्या संधी मिळतील.
कर्क (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना आज भागीदारी व्यवसायात विशेष लाभ मिळेल. तुमचे ग्राहक तुमच्या उत्पादनाने समाधानी होतील. तसेच आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरीतील लोकांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना आज थोडे सावध राहावे लागेल. मुलांशी वाद होण्याची शक्यता आहे. स्पर्धेमुळे तुमची सुख-शांती नष्ट होऊ शकते. व्यवसायातही परिस्थिती फारशी अनुकूल राहणार नाही.
कन्या (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना भागीदारी व्यवसायात भरपूर नफा मिळेल. एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याच्या संधी मिळतील. नोकरदार लोकही सर्व परिस्थिती शहाणपणाने हाताळण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामकाजावर पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल. नवीन महिना आणि दिवाळी असल्या कारणाने तुमचा उत्साह द्विगुणित होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या जुन्या चुकीतून तुम्हाला चांगला धडा घ्यावा लागेल. तसेच, तुमच्या अनेक दिवसांपासून ज्या समस्या आहेत त्या लवकरच दूर होतील.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तसेच, तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तसेच, विद्यार्थ्यांची सुट्टी असल्या कारणाने ते खुश असतील.आज दिवाळी पाडवा असल्या कारणाने पती-पत्नीच्या नात्यात गोडवा वाढलेला दिसेल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. व्यवसायिक लोकांना आपल्या कामात थोडासा बदलाव करावा लागेल. मित्रांच्या सहवासाने तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मात्र, आज दिवसभरात तुमचा खूप खर्च होईल. दिवाळीचा सण असल्या कारणाने घरी पाहुण्यांची ये-जा सुरु असेल. तसेच, नवीन काम सुरु करण्यासाठी तुम्हाला काही काळ जाऊ द्यावा लागेल. कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. तसेच, कुटुंबियांबरोबर लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेला भेट द्याल.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल. तसेच, जर तुम्ही नवीन घर, वाहन, प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्याचबरोबर तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. मात्र, तुमच्यासमोर अनेक आव्हानंदेखील असतील. त्याचा तुम्हाला सामना करता यायला हवा. तसेच, तुमच्या आरोग्याबाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवता येईल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: