Hanuman Jayanti 2024 : 23 की 24 एप्रिल हनुमान जयंती नेमकी कधी? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि योग्य पद्धत
Hanuman Jayanti 2024 : भगवान हनुमानाचं नाव घेतल्याने आपल्या जीवनातील सर्व दु:ख, संकटे, भूत, पिशाच्च पळून जातात असं म्हणतात.
Hanuman Jayanti 2024 : दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) उत्सव साजरा केला जातो. भगवान हनुमान आजही पृथ्वीवर भौतिकरित्या विराजमान आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगवान हनुमानाचं नाव घेतल्याने आपल्या जीवनातील सर्व दु:ख, संकटे, भूत, पिशाच्च पळून जातात असं म्हणतात. म्हणून तर हनुमान चालीसा लिहीणारे तुलसीदास यांनीही भगवान हनुमानाला, 'संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरै हनुमान बल बीरा'. असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा आहे की, भगवान हनुमानात सर्व प्रकारच्या वेदना आणि दु:ख दूर करण्याची क्षमता आहे. पण, यावेळी हनुमान जयंती नेमकी कोणत्या दिवशी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर, पूजेची शुभ वेळ, मुहूर्त आणि योग्य पद्धत जाणून घ्या.
हनुमान जयंती कधी?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र पौर्णिमा 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 03:25 वाजता सुरु होईल आणि 24 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पहाटे 05:18 वाजता समाप्त होईल. त्यानुसार, यंदाची हनुमान जयंती मंगळवार 23 एप्रिल रोजीच साजरी केली जाणार आहे.
हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त
हनुमान जयंतीला बजरंगबलीची पूजा करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिला शुभ मुहूर्त सकाळचा असेल. तर, दुसरा, शुभ मुहूर्त रात्रीचा असणार आहे.
पहिला शुभ मुहूर्त - 23 एप्रिल रोजी सकाळी 09:03 ते 01:58 पर्यंत असेल.
दुसरा शुभ मुहूर्त - 23 एप्रिल रोजी रात्री 08:14 ते 09:35 पर्यंत असेल.
हनुमान जयंती पूजा विधी
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून बजरंगबलीची पूजा करावी. शुभ मुहूर्त पाहूनच हनुमानाची पूजा करा. यासाठी सर्वात आधी ईशान्य दिशेला पोस्टवर लाल कापड पसरवा. हनुमानजींची पूजा करताना बाजूला भगवान श्री राम यांच्याही फोटोची पूजा करा. भगवान हनुमानाला लाल आणि भगवान राम यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा. देवाला नैवेद्य दाखवताना लाडूंबरोबर तुळशीची डाळही अर्पण करा.
'या' मंत्राचा जप करा
भगवान हनुमानाची पूजा करताना सर्वात आधी ओम राम रामाय नम:या मंत्राचा जप करा. त्यानंतर हनुमानाच्या ओम हं हनुमते नम:या मंत्राचा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :