Budh Uday 2024 : आजपासून सुरु होतोय बुध ग्रहाचा उदय; मेष-मिथुनसह 'या' 6 राशींच्या जीवनावर 'ग्रहण' लागणार, मोठा आर्थिक फटका बसणार
Budh Uday 2024 : आजपासून सहा राशीच्या लोकांच्या आयुष्यात वाईट दिवस सुरू होऊ शकतात. मीन राशीत बुधाचा उदय या लोकांना आर्थिक नुकसानासह अनेक त्रास देऊ शकतो.
Budh Uday 2024 : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला (Budh Uday) ग्रहांचा राजा म्हटलं जातं. बुध ग्रह हा बुद्धी, व्यापार, संवाद, शिक्षण आणि वाणीचा कारक आहे. बुध ग्रह मीन राशीत अस्त या स्थितीत आहे. आज सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी मीन राशीत अस्त असणाऱ्या बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुधचा उदय मेषपासून ते मीन राशीपर्यंत प्रत्येक राशीच्या लोकांवर शुभ-अशुभ प्रभाव टाकतो. यामध्ये सहा राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी बुधचा उदय हा त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करणारा आहे. बुधच्या उदयाने कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊ.
बुध ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव
मेष रास
बुध ग्रहाच्या वाढीमुळे मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. या राशीच्या लोकांना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच, एखाद्याकडून कर्ज घेण्याची गरज भासू शकते. या दरम्यान तुमच्या खर्चातही वाढ होणार आहे. यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तुम्ही केलेले प्रत्येक प्रयत्नदेखील अयशस्वी होताना दिसतील. गुंतवणुकीतून आर्थिक नुकसान होईल.
मिथुन रास
बुध ग्रहाच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते. करिअरमध्ये गडबड होऊ शकते. यावेळी कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. पैशांचा जपून वापर करा. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि त्या हाताळण्यात तुम्ही अपयशी ठरू शकता.
तूळ रास
बुध ग्रहाचा उदय झाल्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होईल, त्यामुळे यावेळी बजेट सांभाळा. जेणेकरून आर्थिक बाबी नियंत्रणात राहतील. तणावाचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक वस्तू खरेदी करू नका. ध्यान करा, यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
वृश्चिक रास
बुधाच्या उदयामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक त्रास होऊ शकतात. तुमचे विचार आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. याशिवाय तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. अचानक आलेल्या या समस्येमुळे तुम्हाला मोठ्या अडचणी येऊ शकतात. तुम्हाला विनाकारण प्रवासही करावा लागू शकतो.
धनु रास
बुधाच्या उदयामुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढतील. अनियंत्रित खर्च तुम्हाला खूप त्रास देतील. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठे चढ-उतार होऊ शकतात. काही गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: