Gurupushyamrut Yog 2024 : गुरुपुष्यामृत योगामुळे 'या' राशींना येणार चांगले दिवस; उत्पन्नात होणार वाढ
Guru Pushya Nakshatra Yog : आज, म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी अमृत सिद्धी योग, गुरु पुष्य योगांसह अनेक फायदेशीर योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस मिथुन, कन्या राशीसह 5 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या 5 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
![Gurupushyamrut Yog 2024 : गुरुपुष्यामृत योगामुळे 'या' राशींना येणार चांगले दिवस; उत्पन्नात होणार वाढ Gurupushyamrut Yog 2024 Guru Pushya Nakshatra Yog will be beneficial for these 5 zodiac signs will get growth in money Gurupushyamrut Yog 2024 : गुरुपुष्यामृत योगामुळे 'या' राशींना येणार चांगले दिवस; उत्पन्नात होणार वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/3b8fbfdb4dd54cbc0bddd817561511171708579572899713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Guru Pushya Nakshatra Yog : सध्या लग्न सराई जोरात सुरू आहे. त्यानिमित्त सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी देखील ओघाने आलीच. त्यातच आज, 22 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्य नक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीपत हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासह गुरुवारी येतो. गुरुपुष्यामृत योग सकाळी 06.48 पासून सुरू होऊन तो दुसऱ्या दिवशी सकाळी 04.43 पर्यंत असेल. गुरुवार दत्तगुरूंचा आणि गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा असल्याने हा योग 4 राशींसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे. या 4 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 22 फेब्रुवारीचा दिवस लाभदायक आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि ते धार्मिक प्रवास करू शकतात. तुम्ही आज एखाद्या नातेवाईकाच्या घरी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, जिथे तुमचा चांगला पाहुणचार केला जाईल आणि यावेळी तुम्हाला अनेक खास लोकांना भेटण्याची संधी देखील मिळेल. तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणताही सल्ला दिला तर तो नक्कीच त्याची अंमलबजावणी करेल, जे पाहून तुम्हाला आनंद होईल आणि त्याचं कामही पूर्ण होईल. वडील आणि शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि तुमची सर्वांशी महत्त्वाची चर्चाही होईल.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज काही विशेष काम पूर्ण करू शकतात आणि तुम्ही तुमच्या पैशातील काही भाग धार्मिक कार्यात दान कराल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला आज चांगला नफा मिळवून देऊ शकते. नोकरदारांना करिअरमध्ये लाभ मिळेल आणि त्यांची चांगली प्रगती होईल. तुम्हाला नोकरीसाठी परदेशातूनही चांगली संधी मिळू शकेल. नोकरी शोधण्याच्या चिंतेत असलेल्यांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज व्यावसायिक चांगला व्यवसाय करतील आणि व्यावसायिक करारांमध्ये नफा मिळवण्यात यशस्वी होतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. धनु राशीच्या लोकांमध्ये आज प्रबळ आत्मविश्वास असेल, ज्यामुळे ते सर्व अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे. आज व्यावसायिक चांगला नफा मिळवू शकतील. नोकरदार लोकांच्या कौशल्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणखी सुधारणा होईल, ज्यामुळे ते वरिष्ठांना प्रभावित करतील आणि त्यांच्या पदोन्नतीची देखील शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यासासोबतच एखाद्या संशोधनातही भाग घेऊ शकतात. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देऊ शकता. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल.
मीन रास (Pisces)
आज मीन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असेल. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. मीन राशीचे लोक आज खूप आनंदी राहतील, कारण त्यांचं उत्पन्न वाढेल आणि काही सरकारी योजनांचाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमच्या सुखसोयी वाढतील. तुम्ही लहान मुलांसोबत मजा करण्यात थोडा वेळ घालवाल, त्यामुळे तुमचा जो काही ताण होता तो निघून जाईल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. आज तुमची घर, दुकान इत्यादी खरेदी करण्याची इच्छा भगवान विष्णूच्या कृपेने पूर्ण होईल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कुटुंबात कोणतीही पूजा, भजन, कीर्तन इत्यादींचं आयोजन करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Guru Pushyamrut Yog 2024 : आज गुरुपुष्यामृत योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि उपाय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)