Guru Vakri : 9 ऑक्टोबरपासून पालटणार 'या' 3 राशींचं नशीब; गुरू चालणार वक्री चाल, बँक बॅलन्समध्ये होणार अपार वाढ
Guru Vakri 2024 : ऑक्टोबर महिन्यात गुरू वृषभ राशीत वक्री होईल, अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या धनसंपत्तीत देखील वाढ होईल.
Guru Vakri 2024 Vrushabh Rashi : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु हा ज्ञान, शिक्षण, मुलं, भावंडं, धार्मिक कार्य, धन-संपत्ती, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा गुरूच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो.
गुरू 9 ऑक्टोबर रोजी वृषभ राशीत वक्री (Guru Vakri 2024) होईल, म्हणजेच उलट चाल चालेल. गुरू 5 फेब्रुवारीपर्यंत याच अवस्थेत वृषभ राशीत भ्रमण करत राहील. यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. तसेच या लोकांना मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा मिळू शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
गुरूची वक्र गती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण तुमच्या राशीच्या धन आणि वाणी घरात गुरु ग्रह प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, तुमच्या व्यवसायात मोठी डील मिळाल्याने तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात मदत होईल. तुम्हाला मोठा गुंतवणूकदार देखील मिळू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. याशिवाय समाजात तुम्ही लोकप्रिय व्हाल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची वक्री शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. यासोबतच भौतिक सुखसोयींमध्येही वाढ होईल आणि धनसंपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकतं.
कुंभ रास (Aquarius)
गुरूची वक्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. फेब्रुवारीपर्यंतच्या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अभूतपूर्व यशही मिळेल. यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही खूप प्रगती होईल. या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचं सुख मिळू शकतं. दुसरीकडे, जर तुम्ही मालमत्ता, जमीन आणि रिअल इस्टेटशी संबंधित काम करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या मदतीने आर्थिक लाभ मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :