Guru Pushya Yog 2024 : अवघ्या काही तासांतच जुळून येणार गुरु पुष्य योग; जाणून घ्या शुभ मुहूर्त
Guru Pushya Yog 2024 : गुरु पुष्य योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगाचा सुद्धा दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. गुरु पुष्य योगात तुम्ही काही कार्य केल्यास धन-संपत्तीत चांगली वाढ होईल.
Guru Pushya Yog 2024 : गुरु पुष्य योग 26 सप्टेंबरला म्हणजेच उद्या जुळून येणार आहे. हा फार शुभ योग मानला जातो. गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र असतो त्या दिवशी गुरु पुष्य योगाची (Guru Pushya Yog) निर्मिती होते. ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु पुष्य योगात अशा काही गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपलं आयुष्य स्थिर होईल. या योगात केलेल्या कार्यामुळे दीर्घकाळापर्यंत यश मिळतं.
गुरु पुष्य योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगाचा सुद्धा दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. गुरु पुष्य योगात तुम्ही काही कार्य केल्यास धन-संपत्तीत चांगली वाढ होईल.
कधीपासून कधीपर्यंत आहे गुरु पुष्य योग?
26 सप्टेंबर रोजी जुळून येणारा गुरु पुष्य योग रात्रीच्या वेळी जुळून येणार आहे. पंचांगानुसार, पुष्य नक्षत्राची सुरुवात रात्री 11 वाजून 34 मिनिटांनी होणार आहे. तर, 27 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. पण, सूर्योदयाबरोबरच, दिवसाची सुरुवात होणार आहे. अशातच गुरु पुष्य योग 26 सप्टेंबर रोदी रात्री 11 वाजून 34 मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 12 मिनिटांपर्यंत असणार आहे.
गुरु पुष्य योगात करा 'हे' काम
- गुरु पुष्य योगाच्या वेळी सोनं, सोन्यापासून घडविलेली दागिने, दुकान, प्रॉपर्टी, गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही हे कार्य केलं तर तुमच्या संपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, हातात पैसा टिकून राहील.
- या योगात तुम्ही नवीन दुकान, नवीन कामाची सुरुवात करु शकता. मान्यतेनुसार, या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळू शकते. तसेच, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील.
- गुरु पुष्य योगात तुम्ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करावी. देवी लक्ष्मीला खीर, दुधापासून बनविलेली मिठाई आणि भगवान विष्णूसाठी तुळशीची पानं, पंचामृत, गूळ यांचा नैवेद्य दाखवावा. तसेच, कनकधारा स्त्रोताचं पठण करावं. तुमच्या संपत्तीत चांगली वाढ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व