Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
Kojagiri Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते. ज्याला कोजागर पौर्णिमा असं देखील म्हणतात. त्यानुसार, यंदाची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी हे जाणून घेऊयात.
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेलाच (Kojagiri Purnima) शरद पौर्णिमा असं देखील म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, संपूर्ण वर्षभरात 12 पौर्णिमा तिथी असतात यामध्ये कोजागिरी पौर्णिमा सर्वात विशेष मानली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसह महारास रचला होता. त्यामुळेच, उत्तरेकडील काही भागांत याला रास पौर्णिमा असं देखील म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते. ज्याला कोजागर पौर्णिमा असं देखील म्हणतात. त्यानुसार, यंदाची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी हे जाणून घेऊयात.
कोजागिरी पौर्णिमा 2024 तारीख
वैदिक पंचांगानुसार, यावर्षी कोजागिरी पोर्णिमा अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर ही तिथी पुढच्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 55 मिनिटांपर्यंत असणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.
रवि योगात कोजागिरी पौर्णिमा 2024
यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला रवि योग जुळून येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रवि योग सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी होणार आहे. हा योग संध्याकाळी 7 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी ध्रूव योग सकाळी 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत असणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेला खीर ठेवण्याची वेळ
16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी असणार आहे. या दिवशी रात्री मोकळ्या आकाशात खीर ठेवण्याची वेळ रात्री 08 वाजून 40 मिनिटांनी असणार आहे. या दिवशी महाराष्ट्रासह इतर भागांत मसाला दूध बनवण्याची परंपरा आहे.
कोजागिरी पौर्णिमेला रात्री खीर का ठेवतात?
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जात असल्याने चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. एका भांड्यात खीर किंवा दूध तयार केले जाते. नंतर खाण्यासाठी चंद्रप्रकाशात सोडले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: