Guru Gochar 2024 : गुरू 'या' दिवशी करणार राशी परिवर्तन; 3 राशींच्या लोकांना मिळणार सुखसुविधांचा लाभ, नशिबाला मिळणार कलाटणी
Jupiter Transit 2024 : बृहस्पति 1 मे 2024 रोजी वृषभ राशीत मार्गक्रमण करणार आहे. गुरुच्या मार्गक्रमणामुळे 2024 वर्षात काही राशींचं नशीब उजळणार आहे, या राशींबद्दल जाणून घेऊया.

Jupiter Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरूचं मार्गक्रमण खूप महत्त्वाचं मानलं जातं. गुरु सध्या मेष राशीत भ्रमण करत असून तो 1 मे 2024 रोजी वृषभ राशीत मार्गक्रमण करणार आहे. 1 मे रोजी दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी गुरू वृषभ राशीत मार्गक्रमण करेल. गुरुच्या मार्गक्रमणामुळे काही राशींचं नशीब पालटणार आहे.
गुरू (Guru) हा एक शुभ ग्रह आहे, जो संपत्ती आणि सुख-सुविधांचा लाभ देतो. कुंडलीत हा ग्रह अनुकूल स्थितीत असेल तर जीवनात सकारात्मक बदल येऊ लागतात. तर गुरुच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींचं नशीब उजळणार? या 3 राशींबद्दल जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी 1 मे रोजी होणारं गुरूचं संक्रमण अतिशय अनकूल ठरणार आहे. कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामात शुभ परिणाम पाहायला मिळतील. तुमची आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. गुरूचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणणार आहे. गुरुच्या मार्गक्रमणाच्या शुभ परिणामामुळे तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकाल. या काळात कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. गुरूच्या शुभ प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना प्रत्येक सुख-सुविधांचा लाभ घेता येईल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांचं भाग्य बृहस्पतिच्या राशी परिवर्तनामुळे चमकणार आहे. या राशीचे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील. तुम्हाला या काळाच चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचाही फायदा होऊ शकतो. कन्या राशीचे लोक या वर्षी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर खूप काही साध्य करतील. या राशीच्या लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी मजबूत संबंध असतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराल. या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले बदल होतील.
धनु रास (Sagittarius)
गुरुच्या राशी बदलामुळे धनु राशीचे लोक त्यांच्या जीवनात खूप प्रगती करतील. व्यवसायात तुम्ही एखादी मोठी डील फायनल करू शकता. हे संक्रमण तुमच्यासाठी अनेक शुभ परिणाम घेऊन येणार आहे. या राशीच्या लोकांच्या अनेक व्यावसायिक योजना यशस्वी होतील. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील असेल. धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमच्यासाठी उत्पन्न मिळवण्याचे नवीन मार्ग उघडतील. गुरू ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या वर्षी तुम्हाला परदेशातून चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















