Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं
Gudi Padwa 2024 Date : हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते. यंदा गुढीपाडव्याचा सण 9 एप्रिल रोजी येत आहे, या दिवशी गुढी उभारणीचा योग्य मुहूर्त कोणता? जाणून घ्या
![Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं Gudi Padwa 2024 hindu new year when is Gudi Padwa 2024 date know shubh muhurta tithi and puja vidhi of gudhi ubharni here Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/03/88916c62bdedb03b5c9a4dff0d7824601712127434379713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gudi Padwa 2024 : महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2024) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा हा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे.
गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीला देखील विशेष महत्त्व असतं. यंदा गुढीपूजनाचा आणि सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया.
गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2024 Shubh Muhurta)
पंचांगानुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुरू होणार आहे. ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी समाप्त होईल, त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
यंदा गुढी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? (Gudi Pujan Shubh Muhurta 2024)
यंदा गुढीपाडव्याचा सण हा 9 एप्रिलला (मंगळवारी) साजरा होणार आहे, त्यामुळे 9 तारखेला सकाळी 06:02 ते 10:17 मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून गुढी उभारू शकता.
गुढीपाडव्याची पूजा विधी (How to do Gudhi Pujan?)
गुढिपाडव्याच्या दिवशी सरस्वती देवीची पूजाही केली जाते, या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्त्वं आहे. उंच बांबूच्या काठीवर ही गुढी उभारली जाते. सहसा ती घराच्या छतापासून वर असेल अशीच बांधली जाते. अर्थात शहरी भागात हे अनेकदा शक्य नसल्यामुळे गुढीच्या उंचीपेक्षा ती उभारण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं.
गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घेतली जाते. यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्र, किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टींवर तांब्या (कलश) उपडा ठेवून तोसुद्धा घट्ट बसवला जातो. सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहिलं जातं. ज्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ धुवून घेतली जाते. इथं पाटावर कलश मांडून त्यामध्ये आंब्याची पानं, त्यावर नारळ ठेवून करा तयार करण्यात येतो. ज्यावर हळद-कुंकू वाहून त्याची पूजा करण्यात येते. या कलशापुढेच गुढीचा खास नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी ही गुढी घरावरून उतरवण्यात येते.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)