Astrology : सासरी 'या' राशीच्या मुलींना पती, सासू-सासऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी घ्यावे लागतात कष्ट, जाणून घ्या
Astrology : या' राशी असलेल्या मुलींना सुरुवातीला सासरच्या घरात काही समस्यांना सामोरे जावे लागते.
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार सासरचे कसे असतील? हे कुंडलीच्या सातव्या घरातून शोधले जाते. जेव्हा यावर ग्रहांची वाईट दृष्टी पडते तेव्हा मनुष्याला आव्हानांना सामोरे जावे लागते. कुंडलीतील सातवे घर खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच वैवाहिक जीवन कसे असेल याचीही माहिती मिळते. 'या' राशी असलेल्या मुलींना सुरुवातीला सासरच्या घरात काही समस्यांना सामोरे जावे लागते.
कर्क - ज्या मुलींची राशी कर्क आहे, त्यांना सासरच्या लोकांशी ताळमेळ साधणे कठीण जाते. या राशीच्या मुली खूप भावूक असतात, या राशीचा स्वामी चंद्र आहे, जो मनाचा कारक देखील आहे. त्यामुळे कधी-कधी योग्य मुल्यांकन करण्यात अडचण येते. त्यामुळे सासरच्या घरात पती, सासू यांच्याशी सलोखा प्रस्थापित करण्यात अडथळे येतात, पण नंतर गोष्टी चांगल्या होऊ लागतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. संयम ठेवला पाहिजे. ज्या मुलींचे नाव ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो, वे ने सुरू होते, त्यांची राशी कर्क आहे.
मकर - ज्या मुलींची राशी मकर आहे, त्या स्पष्टवक्त्या असतात, त्यामुळे त्यांना सासरच्या घरात अडचणींचा सामना करावा लागतो. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीवर शनीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात शनिला न्यायाधीश म्हणून वर्णन केले आहे. यामुळे या राशीचे लोक योग्यला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणायला वेळ लावत नाहीत. मकर राशीच्या मुली त्यांचे प्रत्येक काम गांभीर्याने घेतात. पण स्टेट फॉरवर्ड असल्यामुळे सुरुवातीला लोक त्यांना बरोबर समजून घ्यायला विसरतात. पण जसजसा वेळ निघून जातो, तसतशी ती आपल्या कौशल्याने सर्वांची मने जिंकण्यात यशस्वी होते. अडचणीच्या वेळी ते भक्कम भिंतीसारखे उभे असतात. ज्या मुलींचे नाव भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी, है ने सुरू होते, त्यांची राशी मकर आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :