Gemini Horoscope Today 16 February 2023 : मिथुन राशीचे वैवाहिक जीवन असेल आनंदी, कामात घाई टाळा, राशीभविष्य जाणून घ्या
Gemini Horoscope Today 16 February 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल नाही. नशीब तुमच्या सोबत नाही. कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका.
Gemini Horoscope Today 16 February 2023 : मिथुन आजचे राशीभविष्य, 16 फेब्रुवारी 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आज काही कामात अडचण येऊ शकते किंवा अडथळे येऊ शकतात. आज तुम्ही इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष न देता फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आज आरोग्याची काळजी घ्या. मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल नाही. नशीब तुमच्या सोबत नाही. कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका. आजचे राशीभविष्य जाणून घ्या
मिथुन राशीचा आजचा दिवस कसा असेल?
मिथुन राशीचे लोक भूतकाळात केलेल्या चुकांमधून शिकून पुढे जातील. असे प्रयत्न केल्याने तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि नात्यात गोडवाही वाढेल. तुम्ही ताकदीने नवीन सुरुवात देखील कराल. घरामध्ये काही शुभ कार्याशी निगडीत योजना देखील बनवली जाईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ले पाळा. त्यांचे सहकार्य तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. अनावश्यक कामात आपला वेळ वाया घालवू नका. अनावश्यक खर्च थांबवणे आवश्यक आहे. ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील. व्यवसाय वाढवण्यासाठी भागीदारी फायदेशीर ठरेल, प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढेल. नोकरीत इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही सुधारेल.
मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
मिथुन राशीचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधांमध्येही जवळीकता येईल. यासोबतच काही मनोरंजनाशी संबंधित कामात वेळ जाईल. आज घरातील लोकांसोबत फिरण्याचा प्लॅन बनू शकतो.
आज नशीब 72% तुमच्या बाजूने
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल, त्यांना त्यांच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नात्यात गोडवा राहील आणि भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रवासात एखादी प्रिय वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती असेल, त्यामुळे सावधगिरी बाळगा. अचानक आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. एखाद्या संशोधनात गुंतलेल्या लोकांसाठी काळ अनुकूल आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्ही एखादी योजना बनवू शकता, ज्यामुळे तुमचे अडकलेले काम पूर्ण होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा.
आज तुमचे आरोग्य
आज दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणत्याही कामात घाई टाळा. तुम्हाला अनेक वेळा इशारा देण्यात आला आहे की, घशाचा कोणताही संसर्ग गंभीरपणे घ्या आणि ताबडतोब उपचार करा.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय
तुळशीच्या रोपाला कच्चे दुध मिसळून पाणी द्या, तुळशीच्या मातीने टिळा लावा आणि कामाला जा.
शुभ रंग : पिवळा
शुभ अंक : 9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या