(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gemini Horoscope Today 13th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या; आजचं राशीभविष्य
Gemini Horoscope Today 13th March 2023 : तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना सांगा यामुळे तो खूप खुश होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
Gemini Horoscope Today 13th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांना आज नोकरी बदलीसंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. स्पर्धेत पुढे राहा. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा तसेच तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.
आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना सांगा यामुळे तो खूप खुश होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. व्यावसायिकदृष्ट्या भरभराट होईल. परिश्रमाचे मोल मिळेल.
स्वत:साठी वेळ काढा
आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही समजूतदारपणाने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा. तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाची साथ राहील. मानसिक समाधान लाभेल.
आजचे मिथुन राशीचे आरोग्य :
आरोग्य चांगले राहील पण, तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. थोडा वेळ विश्रांती घ्या.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय :
ध्यान करणे लाभदायक ठरेल. योग, निद्रा केल्याने फायदा होईल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :