Fengshui Tips : फेंगशुई गाय सहिष्णुता वाढवते, व्यवसायामध्ये होते वाढ
Fengshui Tips : भगवान श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे. फेंगशुई टिप्समध्ये घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी विविध प्रकारचे प्रतीक स्थापित करण्याचे सांगितले आहे.
Fengshui Tips : भारतात गाय पूजनीय मानली जाते. प्राचीन काळी गाय ही सर्वात मोठी संपत्ती असल्याचे म्हटले जात होते. भगवान श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे. फेंगशुई टिप्समध्ये घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी विविध प्रकारचे प्रतीक स्थापित करण्याचे सांगितले आहे. असे मानले जाते की ही चिन्हे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि घराची आर्थिक स्थिती मजबूत होते. फेंगशुई टिप्सनुसार घरी किंवा ऑफिसमध्ये फेंगशुई गाय ठेवल्याने अनेक फायदे मिळतात.
फेंगशुई टिप्सनुसार, एखाद्या व्यक्तीची सहनशीलता वाढवण्यासाठी गायीची मूर्ती घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवणे शुभ असते. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करते.
फेंगशुईनुसार, वासराला दूध देणाऱ्या गायीची मूर्ती घरात ठेवल्यास संतान प्राप्ती होते. गायीची ही मूर्ती तुमच्या बेडरूममध्ये अशा प्रकारे लावा की तुमची नजर पुन्हा पुन्हा त्यावर पडेल.
फेंगशुईनुसार घराच्या आग्नेय दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. यामुळे मानसिक शांती मिळते. व्यवसाय वाढतो आणि आर्थिक सुबत्ता वाढते. फेंगशुई गाईची मूर्ती घरात ठेवल्याने समस्या कमी होतात. सुख-समृद्धी वाढते. लोकांचे नशीब उघडते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :