Dev Deepawali 2022 : कार्तिक पौर्णिमेला करा फक्त 'हे' काम, देवी लक्ष्मीची होईल कृपा, देव देतील भरभरून आशीर्वाद!
Dev Deepawali 2022 : कार्तिक महिन्यात दीपोत्सवाला विशेष महत्त्व आहे. दिवा हे प्रकाशाचे प्रतीक आहे, जो अंधार दूर करतो.
Dev Deepawali 2022 : हिंदू धर्मग्रंथांमध्ये, प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे महत्त्व आहे. पण कार्तिक महिन्यातील पौर्णिमा (Kartik Pournima) तिथीला वेगळेच महत्त्व आहे. कार्तिक महिना हा सर्व महिन्यांत श्रेष्ठ मानला जातो. कार्तिक महिन्यात दीपोत्सवाला विशेष महत्त्व आहे. दिवा हे प्रकाशाचे प्रतीक आहे, जो अंधार दूर करतो. म्हणूनच दीपावलीच्या (Diwali 2022) 15 दिवसांनी देव दीपावली साजरी केली जाते. कार्तिक महिन्यात दीपप्रज्वलन, जप, दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. असे केल्याने व्यक्तीला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद मिळतो.
दीपदान करण्याची परंपरा
कार्तिक महिन्यात तुम्हाला कोणताही उपाय करता आला नसेल तर देव दीपावलीला दिवा अवश्य दान करा. काशीमध्ये कार्तिक महिन्यात दीपदान करण्याची परंपरा आहे. ज्यांना महिनाभर दिवे दान करता येत नाही, त्यांना देवदीपावलीला दिवा लावल्याने शुभफळ मिळू शकतात. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने गरिबी नष्ट होते असे मानले जाते. ज्योतिषाशास्त्रानुसार, पौराणिक मान्यतेनुसार दिवा लावल्यानंतर पूजा केल्याने देवी लक्ष्मी आणि सर्व देवतांचा आशीर्वाद होतो. तुळशीच्या ठिकाणी, गंगा नदी आणि मंदिरात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
'असे' केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते
संध्याकाळ आणि पहाटे सूर्य नसताना जिथे दिव्याचा प्रकाश असतो तिथे देवांचा वास असतो असे म्हणतात. त्यामुळे या शुभ दिव्याचा उपयोग कल्याणासाठी केला पाहिजे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यानंतर 11 दिवे दान करा. नंतर नदीच्या काठावर असलेल्या मंदिरात पूजा करून घरी परतावे. घरी जाऊन मातीचे भांड्यात, तसेच मंदिरात तुपाचा दिवा लावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्ही घरी कनकधारा स्तोत्राचे पठणही करू शकता.
सौभाग्य समृद्ध होईल
घरात तूप किंवा मोहरीच्या तेलाचे 11 दिवे लावा. ओम तुलसीभ्यै नमः या मंत्राचा उच्चार करताना प्रथम तुळशीजवळ मातीचा दिवा ठेवा. घराच्या दाराबाहेर दिवा ठेवा. उरलेले नऊ दिवे तुम्ही मंदिरात ठेवा. यानंतर आपल्या मूर्तीची पूजा करण्यासोबतच विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मीचालिसाचे पठण करावे. असे केल्याने तुमचे सौभाग्य समृद्ध होईल आणि घरात लक्ष्मी वास करेल. देव दीपावलीच्या दिवशी मंदिरात जाऊन आपल्या मूर्तीची पूजा करावी. आपल्या देवतेला मंत्रोच्चार करताना मंदिरात दिवा दाखवा. मंदिराच्या बाहेर पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. मग ते गरजूंना दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
इतर महत्वाच्या बातम्या
Dev Diwali 2022 : देव पृथ्वीवर येऊन साजरी करतात दिवाळी; काय आहे 'या'मागचं कारण आणि 'देव दिवाळी'चं महत्त्व?