एक्स्प्लोर
Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये? जाणून घ्या सविस्तर माहिती
Datta Jayanti 2024 : धार्मिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तगुरुंचा जन्म झाला. त्यानुसार, आज दत्त जयंती साजरी केली जाते.
Datta Jayanti 2024 : हिंदू धर्मात दत्त जयंतीला (Datta Jayanti) विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार, आज मार्गशीर्ष महिन्याच्या तिथीला दत्त जयंती साजरी केली जातेय. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त गुरुंचा जन्म झाला. भगवान दत्तात्रेय यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचा एक भाग मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तगुरुंचा जन्म झाला. आज दत्त जयंती पौर्णिमा पहाटे 04 वाजून 58 मिनीटांनी सुरु झाली तर 15 डिसेंबर रोजी दुपारी 02.31 वाजता या तिथीची समाप्ती होईल. त्यामुळे आजच्या शुभ दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात.
दत्त जयंतीला 'या' गोष्टी कराव्यात
- दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी त्रिमूर्तीची मनोभावे पूजा करावी.
- या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करुन गंगाजलाने स्नान करावं.
- तसेच, देवाला फळं, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा.
- दत्त जयंतीच्या दिवशी भगवदगीतेचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे संकटं दूर होतात असं म्हणतात.
- तसेच, या दिवशी गरिबांना, गरजू व्यक्तींना दान करणं शुभ मानलं जातं.
दत्त जयंतीला 'या' गोष्टी चुकूनही करु नका
- दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार खाणं टाळावं.
- तसेच, आजच्या दिवशी मद्यपान करणं अशुभ मानलं जातं.
- आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरु नये.
- तसेच, कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विनाकारण वाद करु नका.
- आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटंही बोलू नये.
- तसेच, घराबाहेर पडताना रिकाम्या हाती घराबाहेर पडू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement