एक्स्प्लोर

Dahi Handi 2024 : का साजरी केली जाते दहीहंडी? जाणून घ्या महत्त्व

Dahi Handi 2024 Date : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात दहीहंडी साजरी केली जाते. महाराष्ट्रासह विविध भागांत या दिवशी दहीहंडीचा खेळ खेळला जातो आणि श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवसाला गोपाळकाला देखील म्हटलं जातं.

Dahi Handi 2024 Date : देशभरात दरवर्षी दहीहंडीचा (Dahi Handi 2024) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला दहीहंडीचा सण साजरा केला जातो. हा सण विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या थाटात साजरा होतो. दहीहंडी ही एक प्रसिद्ध क्रीडा स्पर्धा आहे, ज्यामध्ये अनेकजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

दहीहंडी 2024 कधी? (Dahi Handi 2024 Date)

दहीहंडीचा सण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. तर 27 ऑगस्टला दहीहंडीचा सण साजरा होणार आहे.

दहीहंडी सण का साजरा होतो? (Why we celebrate Dahi Handi?)

धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवकीच्या पोटी भगवान विष्णूचं रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस संपूर्ण भारतात कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाला लोणी खूप आवडायचं. म्हणूनच ते त्यांच्या मित्रांसह वर चढायचे आणि दह्याने भरलेलं भांडं शोधायचे. त्यामुळेच श्रीकृष्णाला माखन चोर असंही म्हटलं जातं. त्यामुळे श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कारनांम्यांचं स्मरण म्हणून देशभरातील विविध राज्यांमध्ये दहीहंडीचा सण साजरा केला जातो.

जन्माष्टमी 2024 कधी आहे? (Janmashtami 2024 Date)

यंदा 26 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. यावर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 39 मिनिटांनी सुरू होत आहे. 27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल. 

जन्माष्टमी 2024 शुभ मुहूर्त (Janmashtami 2024 Puja Muhurta)

कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असेल. यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल.

सर्वार्थ सिद्धी योगात साजरी होणार जन्माष्टमी (Janmashtami 2024 Shubh Yog)

या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. जन्माष्टमी दिवशी सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 3:55 पासून सुरू होईल आणि 27 ऑगस्टला पहाटे 5:57 पर्यंत चालेल. अशा स्थितीत सर्वार्थ सिद्धी योगात श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा होणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Janmashtami 2024 Date : श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget