Chandra Gochar 2024 : ख्रिसमसच्या दिवशी 'हा' ग्रह टाकणार 'गुगली'; सव्वा दोन दिवसांसाठी करणार राशी परिवर्तन, 'या' राशींची होणार चांदी
Chandra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राला मन, शीतलता आणि भावनांचा कारक ग्रह मानला जातो. चंद्र ग्रह कोणत्याही राशीत फक्त सव्वा दोन दिवसांपर्यंत असतो.
Chandra Gochar 2024 : सरत्या वर्षाच्या शेवटी अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. यामध्ये चंद्रसुद्धा (Moon) राशी परिवर्तन करणार आहे. हा चमत्कार फक्त ख्रिसमसच्या दिवशीच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ख्रिसमसचा दिवस फार खास असणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राला मन, शीतलता आणि भावनांचा कारक ग्रह मानला जातो. चंद्र ग्रह कोणत्याही राशीत फक्त सव्वा दोन दिवसांपर्यंत असतो. वैदिक पंचांगानुसार, ख्रिसमसच्या दिवशी बुधवारी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत संक्रमण करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर महिन्यात अनेक मोठे ग्रह आपल्या नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. त्यानुसार, 25 डिसेंबरच्या दिवशी रात्री 1 वाजून 50 मिनिटांनी चंद्र देव कन्या राशीतून निघून तूळ राशीत संक्रमण करणार आहे. या संयोगामुळे चंद्राच्या कृपेने 3 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
चंद्र ग्रह सध्या सिंह राशीत आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांवर चंद्राची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होणार आहे. या दरम्यान तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. तरुणांच्या करिअरमध्ये चांगलं यश पाहायला मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
ख्रिसमसच्या दिवशी चंद्र देवाची कन्या राशीच्या लोकांवर विशेष कृपा असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळेल. तसेच, विद्यार्थ्यांना करिअर पुढे नेण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यवसायातील अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
या राशीच्या लोकांवर चंद्राची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमची तब्येत चांगली असेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली असेल. तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करु शकता. आरोग्य चांगलं असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: