Shani Dev : ना शनीची ढैय्या, ना साडेसाती, ना महादशा; 2025 वर्ष 'या' एका राशीसाठी ठरणार लकी, मिळणार फक्त लाभ
Shani Dev : शनी अडीच वर्षातून एकदा राशी परिवर्तन करतात. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला विशेष स्थान देण्यात आलं आहे. शनीला (Shani Dev) पापी आणि क्रूर ग्रह मानतात. तसेच, शनीचं (Lord Shani) राशी परिवर्तन ज्योतिष शास्त्रात फार महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, 2025 मध्ये शनी राशी परिवर्तन करणार आहे. शनी अडीच वर्षातून एकदा राशी परिवर्तन करतात. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशींवर साडेसाती सुरु होते तर काही राशींवर (Zodiac Signs) साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
मात्र, या सगळ्यात एक रास अशी आहे जिच्यावर शनीच्या साडेसातीचं, ढैय्या आणि महादशा असं कोणतंच सावट नसणार आहे. ही रास नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.
2025 मध्ये 'या' राशीवर असणार शनीची साडेसाती
शनीचे मीन राशीत प्रवेश करताच मेष राशीच्या लोकांवर असणारा शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाने कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा, मीन राशीवर दुसरा तर मेष राशीवर पहिला टप्पा सुरु होणार आहे.
2025 मध्ये 'या' राशीवर नसणार शनीची साडेसाती
शनीच्या राशी परिवर्तनाने मकर राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव नसणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नवीन वर्षात कोणतीच चिंता करण्याची गरज नाही.
साडेसातीचा प्रभाव कमी झाल्याने मिळेल लाभ
ज्या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होईल अशा राशीच्या लोकांचा व्यवसायात चांगला विस्तार होईल. तसेच, धन-संपत्तीची चांगली आवक वाढेल. तुमची पदोन्नती वाढेल. तसेच, उत्पन्नाच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: