एक्स्प्लोर

Chanakya Niti : तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका 'या' 3 गोष्टी; आर्थिक प्रगतीसाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र

Chanakya Niti : चाणक्य यांनी आपले विचार आयुष्य, व्यवसाय, सामाजिक जीवन, नैतिक आचरण, अर्थव्यवस्था या प्रत्येक विषयांत सांगितले आहेत.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आपले अमूल्य विचार श्लोकांमध्ये मांडले आहेत. चाणक्य यांनी आपले विचार आयुष्य, व्यवसाय, सामाजिक जीवन, नैतिक आचरण, अर्थव्यवस्था या प्रत्येक विषयांत सांगितले आहेत. आचार्यांच्या विचारांचं पालन केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक आणि महत्त्वाचे बदल घडतात.  

खरंतर, आचार्य चाणक्य यांचं खरं नाव विष्णुगुप्त होतं आणि त्यांच्या पित्याचं नाव चणक असं होतं. आपल्या वडिलांच्या नावावरूनच त्यांना लोक चाणक्य म्हणायचे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या सिद्धांतात जे मूल्य, विचार मांडले होते ते आजच्या काळातही सगळ्यांवर लागू होतात. धन-संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांनी कोणती तत्त्व मांडली आहेत ते जाणून घेऊयात. 

उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणाम्।
तडागोदरसंस्थानां परीस्रव इवाम्भसाम्।।

या श्लोकाच्या माध्यमातून चाणक्य सांगतात की,आयुष्यात पैसा फार महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण पैसे कमावतो तसे ते खर्चही करता आले पाहिजेत. पण, जर पैसे ठराविक मर्यादेपर्यंत वापरले तर पैशांचं रक्षण करता येऊ शकतं.आपल्या विचारांत चाणक्य यांनी पैशांची तुलना पाण्याशी केली आहे. चाणक्य सांगतात की, पैशांची पाण्याशी तुलना करताना चाणक्य म्हणतात की ज्याप्रमाणे भांड्यात ठेवलेलं पाणी वापरलं नाही तर ते खराब होते. अगदी त्याचप्रमाणे पैसा वापरला नाही तर त्याचं मूल्यही कमी होतं. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे जमा करणे योग्य नाही. पण, जर तुमच्याकडे पैसे असतील तर ते धार्मिक कार्यात गुंतवा.

तुमची कमाई कोणाला सांगू नका

तुमची संपूर्ण कमाई कोणाला सांगू नका. याशिवाय भविष्यात कोणत्याही व्यवहारामुळे तुमचं नुकसान होत असेल तर ते कोणालाही सांगू नका. जरी ती व्यक्ती तुमच्या जवळची असेल तरी या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा. या गोष्टी शेअर केल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय प्रतिष्ठेलाही धक्का बसतो.

गरजा मर्यादित ठेवा 

आपला विचार मांडताना आचार्य सांगतात की, पैशांबाबत कधीही कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घ्या. पैसे खर्च करताना योग्य संतुलन ठेवा. अतिशय विचारपूर्वक आणि फक्त गरजांसाठी पैसे खर्च करा. जे लोक सुरक्षितता, धर्मादाय आणि गुंतवणुकीसाठी पैसा खर्च करतात ते त्यांचे जीवन योग्य मार्गाने जगतात असं आचार्य सांगतात. 

कोणता पैसा चांगला?

काही लोक पैशाला फक्त पैसा म्हणून पाहतात. पण चाणक्य म्हणतात की, फक्त धन हीच चांगली असते जी कष्टाने मिळवली जाते. अनैतिक काम करून भरपूर पैसा मिळवला तरी तो टिकत नाही. असे पैसे नंतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या हातून निसटतातच. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Guru Gochar 2026 : तब्बल 12 वर्षांनी गुरु ग्रहाचं 'महासंक्रमण'; ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी नांदतील सुखात, पैशांचा पडणार धो-धो पाऊस

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Surya Gochar 2026 : ग्रहांचा राजा सूर्याचं महासंक्रमण! 17 सप्टेंबरपासून 5 राशींची पाचही बोटं तुपात, हातात खेळणार पैसाच पैसा
ग्रहांचा राजा सूर्याचं महासंक्रमण! 17 सप्टेंबरपासून 5 राशींची पाचही बोटं तुपात, हातात खेळणार पैसाच पैसा
Spiritual: आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
Shani Sade Sati : शनिच्या साडेसातीचा 'हा' टप्पा सर्वात कठीण; नोकरी, पैसा, आरोग्य सगळंच...मेष, कुंभ, मीन राशीच्या लोकांना...
शनिच्या साडेसातीचा 'हा' टप्पा सर्वात कठीण; नोकरी, पैसा, आरोग्य सगळंच...मेष, कुंभ, मीन राशीच्या लोकांना...
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाला घरी आणताना रुमालाने का झाकतात? रुमाल नक्की कधी काढावा? यामागील कारण, धार्मिक महत्त्व, परंपरा, श्रद्धा जाणून थक्क व्हाल!
बाप्पाला घरी आणताना रुमालाने का झाकतात? रुमाल नक्की कधी काढावा? यामागील कारण, धार्मिक महत्त्व, परंपरा, श्रद्धा जाणून थक्क व्हाल!
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
Embed widget