Budhaditya Rajyog 2024 : 36 दिवसांनंतर सूर्य आणि बुधच्या युतीने जुळून येणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींचा सुरु होणार 'गोल्डन टाईम'
Budhaditya Rajyog 2024 : ग्रहांचा राजा सूर्य 16 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर 23 सप्टेंबरला धन-संपत्तीचा दाता बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
Budhaditya Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, असे काही राजयोग (Rajyog) आहेत ज्यांच्या कुंडलीत असल्याने व्यक्तीला समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. ग्रहांचा राजा सूर्य (Sun) 16 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर 23 सप्टेंबरला धन-संपत्तीचा दाता बुध ग्रह कन्या राशीत (Virgo Horoscope) प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर या राजयोगाच्या प्रभावाने काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या मान-सन्मानातही चांगली वाढ होईल. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग लाभदायक ठरू शकते. कारण हा योग धन आणि वाणीच्या स्थानावर जुळून येणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. या काळात तुमच्या समाजातील मान-प्रतिष्ठेत प्रचंड वाढ झालेली दिसेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण झाल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. त्याचबरोबर तुमच्या कमाईतून चांगला लाभ मिळालेला तुम्हाला दिसून येईल. तसेच, या काळात तुम्ही जी काही इच्छा मागाल ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या काही योजना आखाल त्या पूर्ण होतील. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करु शकता.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग निर्माण झाल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार फलदायी ठरणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, परदेशात प्रवास करण्याची संधी तुम्हाला या काळात मिळू शकते. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. या काळात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी लाभाचे ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Bhadrapada Month 2024 : भाद्रपद महिना 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा; प्रत्येक पावलावर मिळणार नशिबाची साथ, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार