Weekly Horoscope : नवीन आठवड्यात 'या' 5 राशींच्या लोकांचं नशीब उजळणार; बुध आणि गुरू करणार मालामाल
Weekly Horoscope 1-7 January 2024 : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून नवा आठवडाही सुरू होत आहे. ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील आणि याचा 5 राशींच्या लोकांना करिअर, कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये मोठा फायदा होईल.
Weekly Horoscope 1-7 January 2024 : नवीन वर्षाच्या (New Year 2024) पहिल्या आठवड्यात गुरू थेट मेष राशीत मार्गक्रमण करेल आणि त्यावेळी शुक्र बुध ग्रहासोबत मिळून नवपंचम योग तयार करेल. त्याच प्रमाणे, बुध वृश्चिक राशीमध्ये थेट मार्गक्रमण करेल.
ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या या दोन ग्रहांची चाल 5 राशींच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. हे ग्रह या राशीच्या लोकांना धन, प्रगती आणि प्रतिष्ठा देतील. वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोणत्या राशी भाग्यशाली असतील? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
बुध आणि गुरुच्या चालीमुळे मिथुन राशीच्या लोकांना जीवनात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. तुम्ही काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. विवाहितांसाठी हा काळ आनंददायी असेल.
सिंह रास (Leo)
नवीन आठवड्यात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील, ही कामं पूर्ण केल्याने तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. सरकारी बाजूने फायदा होईल. नोकरी करणार्यांना अपेक्षित बढती, नवीन नोकरी, वाढीव पगार मिळू शकतो. विशेष प्रकल्पात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.
तूळ रास (Libra)
नवीन वर्षाचा पहिला आठवडा तुम्हाला उत्तम यश देईल. तुमचं आयुष्य आनंदाने बहरुन जाईल. काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चमक लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. काही चांगली बातमी मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते.
मकर रास (Capricorn)
तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुम्हाला तुमच्या समस्यांवर उपायही सापडतील. करिअर आणि बिझनेसशी संबंधित चिंता संपेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंद मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात.
कुंभ रास (Aquarius)
तुमचा वर्षाचा पहिला आठवडा उत्तम जाईल. जुन्या अडचणी दूर होतील. तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तब्येत सुधारेल. नवीन योजनेवर काम कराल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. भविष्यात लाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ देखील चांगली राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Budh Gochar 2023: बुध ग्रहाचे वृश्चिक राशीत मार्गक्रमण; 'या' 3 राशींच्या समस्या वाढणार