Budh Gochar 2024 : बुधाचं मार्गक्रमण 'या' 2 राशींसाठी ठरणार अशुभ; प्रत्येक कामात येतील अडथळे
Mercury Transits In Capricorn : बुध 1 फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना नकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या राशींबद्दल जाणून घेऊया.
Mercury Transits 2024 : ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध हा बुद्धिमत्ता, ज्ञान, विचार करण्याची क्षमता आणि उत्तम तर्कशक्तीचा कारक आहे. 1 फेब्रुवारीला बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीतील बुधाचं संक्रमण अनेक राशींसाठी खूप फलदायी ठरणार आह, तर अनेक राशींच्या लोकांना बुधाच्या मार्गक्रमणामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. नेमक्या कोणत्या राशींसाठी बुधाचं (Mercury) मार्गक्रमण अशुभ ठरणार आहे? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी बुध तिसऱ्या घराचा स्वामी आहे. परंतु या मार्गक्रमणानंतर बुध या राशीच्या सातव्या घरात येईल. बुध चढत्या घरात गेल्याने कर्क राशीच्या लोकांना नुकसान सहन करावं लागेल. व्यावसायिकांना बुधाच्या संक्रमणादरम्यान व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल. व्यावसायिक संपर्कात व्यत्यय येऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल, तुमच्याकडे पैसा टिकणार नाही. या काळात केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाहीत.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीसाठी बुध सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. या मार्गक्रमणानंतर बुध तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. बुधाच्या या संक्रमणामुळे तुम्हाला तुमच्या कामात समाधान मिळणार नाही. तुमच्या करिअरमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. तुम्हाला वैवाहिक जीवनातही समस्यांना सामोरे जावे लागेल, जोडीदारासोबत काही कारणांवरुन वाद होतील. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही. तुमच्या व्यवसायात अनेक प्रकारच्या समस्या येण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद वाढू शकतो.
या उपायांमुळे मिळेल दिलासा
बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी तुम्ही भगवान बुधाचा मंत्र 'ओम ब्राम ब्रीम ब्रौम स: बुधाय नमः' या मंत्राचा जप करावा. बुध ग्रहाला शांत करण्यासाठी पोपट, कबूतर आणि इतर पक्ष्यांना धान्य खायला द्यावे. कामाच्या आधी दिवसातून एकदा तरी गायीला चारा देणे चांगले मानले जाते, यामुळे बुध माणसाच्या जीवनावर वाईट परिणाम करत नाही. पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या बुधवारी दान केल्याने बुध ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो. भिजवलेले हरभरे पक्ष्यांना खायला दिल्याने कुंडलीत असलेला कमजोर बुधही मजबूत होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: