एक्स्प्लोर

Budh Gochar 2023: आज बुध करणार वृश्चिक राशीत गोचर; 'या' राशींना मिळणार विशेष लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. त्यानुसार आज बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या मार्गसंक्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. जाणून घेऊया.

Mercury Transits in Scorpio: बुधला ग्रहांचा राजा म्हणतात. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहाचा स्वत:चा असा स्वभाव आहे. त्या त्या स्वभावानुसार ग्रह आपल्या जातकांना फळ देतो. बुध (Mercury) ग्रह हा बुद्धी, ज्ञान, व्यापार, धन आणि संवादाचा ग्रह आहे. बुध व्यक्तीची बुद्धिमत्ता, शिकण्याची क्षमता, सतर्कता, बोलणं आणि भाषा इत्यादींवर परिणाम करतो. ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह आज, म्हणजेच 6 नोव्हेंबरला दुपारी 04:11 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींना लाभ होणार आहे, या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे. बुधाचं हे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. यामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेम येईल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. जे लोक एकमेकांशी बऱ्याच काळापासून प्रेमसंबंधात आहेत, ते त्यांचं नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. वृश्चिक राशीत बुध ग्रहाचं संक्रमण प्रेमविवाह करणाऱ्या लोकांसाठी चांगलं राहणार आहे. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या होत्या, त्याही दूर होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. 

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध दहाव्या आणि स्वर्गीय घराचा स्वामी आहे. बुध वृश्चिक राशीतील तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. हे घर तुमच्या भावंडांचं, छंदांचं, कमी अंतराचा प्रवास, संवाद कौशल्यं यांचं प्रतिनिधित्व करतं.बुध ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम म्हणून तुमची संवादाची शैली प्रभावी होईल. तुमच्या बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या कौशल्याने तुम्ही इतरांवर प्रभाव टाकण्यास सक्षम असाल. बुधाच्या या संक्रमणामुळे कन्या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी करतील. तुमचा अध्यात्मिक कार्याकडे अधिक कल असेल. 

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अकराव्या आणि आठव्या घराचा स्वामी बुध आहे. बुध तुमच्या चढत्या राशीत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुध तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. हे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल. बुध ग्रहामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदल दिसून येतील. तुमचं आरोग्य सुधरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी बुधाचं संक्रमण खूप अनुकूल असणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Ruchak Rajyog: दिवाळीत 'या' राशींवर मंगळाची कृपा; होणार धनलाभ, पैसा अनेक पटींनी वाढणार

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Murali Naik Jawan Martyrs : पाकड्यांशी लढताना जवान शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो
Murali Naik Jawan Martyrs : पाकड्यांशी लढताना जवान शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो
Colonel Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी देखील..., ऑपरेशन सिंदूरनंतर चर्चेतील महिला लष्करी अधिकाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयात चर्चा; नेमकं काय घडलं?
कर्नल सोफिया कुरेशी देखील..., ऑपरेशन सिंदूरनंतर चर्चेतील महिला लष्करी अधिकाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयात चर्चा; नेमकं काय घडलं?
IPL 2025 Suspend: फक्त एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित, स्पर्धा पुन्हा कधी सुरु होणार, BCCI ने दिली मोठी अपडेट 
फक्त एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित, स्पर्धा पुन्हा कधी सुरु होणार, BCCI ने दिली मोठी अपडेट 
India Pakistan War : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातही मॉकड्रील
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातही मॉकड्रील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murali Naik Jawan Martyrs : पाकड्यांशी लढताना जवान शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहोIndia Pakistan War | सांबा जवळच्या जंगलात जेशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा, BSF च्या कारवाईची दृश्यSharad Pawar Satara : महिलांचे शत्रूशी दोन हात, मात्र भरतीला झालेला विरोध, पवारांनी सांगितला किस्साABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 09 May 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Murali Naik Jawan Martyrs : पाकड्यांशी लढताना जवान शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो
Murali Naik Jawan Martyrs : पाकड्यांशी लढताना जवान शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो
Colonel Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी देखील..., ऑपरेशन सिंदूरनंतर चर्चेतील महिला लष्करी अधिकाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयात चर्चा; नेमकं काय घडलं?
कर्नल सोफिया कुरेशी देखील..., ऑपरेशन सिंदूरनंतर चर्चेतील महिला लष्करी अधिकाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयात चर्चा; नेमकं काय घडलं?
IPL 2025 Suspend: फक्त एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित, स्पर्धा पुन्हा कधी सुरु होणार, BCCI ने दिली मोठी अपडेट 
फक्त एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित, स्पर्धा पुन्हा कधी सुरु होणार, BCCI ने दिली मोठी अपडेट 
India Pakistan War : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातही मॉकड्रील
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरानंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातही मॉकड्रील
Sharad Pawar & Dilip Walse Patil: शरद पवारांनी इशारा करुन दिलीप वळसे पाटलांना लिफ्टमध्ये बोलावलं, सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच वरच्या मजल्यावर गेले, पण नंतर...
शरद पवारांनी इशारा करुन दिलीप वळसे पाटलांना लिफ्टमध्ये बोलावलं, सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच वरच्या मजल्यावर गेले, पण नंतर...
पाकड्यांशी लढताना 'उरी'मध्ये मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो, अमर रहेच्या घोषणा
पाकड्यांशी लढताना 'उरी'मध्ये मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो, अमर रहेच्या घोषणा
Omar Abdullah : पाकिस्ताननं शस्त्रं टाकावीत अन्यथा..., जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
पाकिस्ताननं शस्त्रं टाकावीत अन्यथा..., जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
लष्करप्रमुखांना पुढील 3 वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट जारी; गृहमंत्र्यांचीही तातडीची बैठक
लष्करप्रमुखांना पुढील 3 वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट जारी; गृहमंत्र्यांचीही तातडीची बैठक
Embed widget