Bail Pola 2024 Wishes In Marathi : बैलपोळ्याच्या मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; करा बैलजोडीला नमन, पाठवा 'हे' हटके संदेश
Bail Pola Wishes : पोळा हा बैलांचा सन्मान करणारा सण आहे, जो महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी घरात गोडाचं जेवण बनवून बैलांची पूजा केली जाते, या दिनी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना काही खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Bail Pola Wishes In Marathi : शेतकरी बांधवांचा जीवा-भावाचा सोबती म्हणजे बैल. हिंदू पंचांगानुसार आणि आपआपल्या परंपरेनुसार आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिन्यात पोळा साजरा केला जातो. त्यापैकी श्रावणी अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्येचा दिवस हा बैल पोळा (Bail Pola 2024) म्हणून साजरा केला जातो. यंदा श्रावणी अमावस्येचा बैल पोळा महाराष्ट्रात 2 सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.
बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांचं पूजन केले जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून आराम दिला जातो. तसेच, पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत-पूजा करतात. पितरांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते. या निमित्त तुमच्या प्रियजनांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे खास संदेश (Shravan Somvar Wishes in Marathi) पाठवू शकता.
बैल पोळा शुभेच्छा संदेश (Bail Pola 2024 Wishes In Marathi)
बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देणं
बैला खरा तुझा सण
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोसळती श्रावणधारा
धरणिमायही नटली
हिरवाईचा नेसून शालू
नववधूसम भासली
भाव-भक्तिने भरला
आज मनाचा आरसा
पिठोरी अमावस्या
हिंदू संस्कृतीचा वारसा
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: