Astrology Tips : नवऱ्याचं नशीब पालटवून टाकतात 'या' नक्षत्राच्या महिला; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही याच नक्षत्राची
Astrology Tips : ज्योतिष शास्त्रानुसार, स्वाती नक्षत्राच्या महिला आपल्या जोडीदारासाठी फार भाग्यशाली असतात. या महिला अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या असतात.

Astrology Tips : ज्योतिष शास्त्रानुसार, हिंदू धर्मात प्रत्येक नक्षत्राचं वेगळं असं स्थान आहे. त्यानुसार, स्वाती नक्षत्रात जन्मलेल्या महिला अत्यंत आकर्षक, सौम्य स्वभावाच्या आणि स्वतंत्र विचाराच्या असतात. या महिलांचं व्यक्तिमत्व फार संतुलित आणि शांत स्वभावाचं असतं. त्यामुळे या महिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. या महिलांचं वैवाहिक जीवन देखील फार सुखकर आणि यशस्वी असतं. क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील याच नक्षत्राची आहे.
फार धार्मिक असतात या नक्षत्राच्या मुली
ज्योतिष शास्त्रानुसार, स्वाती नक्षत्राच्या महिला आपल्या जोडीदारासाठी फार भाग्यशाली असतात. या महिला अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या असतात. तसेच, त्या पूजा-पाठ, उपवास आणि धार्मिक परंपरेचं पालन करतात. या महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी सदैव तत्पर असतात.
ठरतात आदर्श पत्नी
स्वाती नक्षत्राच्या महिलांमध्ये संयम, समर्पण आणि सेवाभावेची भावना जास्त असते. यामुळे यांना आदर्श पत्नीचा दर्जा मिळतो. स्वतंत्र विचार आणि समर्पण हे यांच्यातील दोन मोठे गुण असतात.
नवऱ्याची ताकद असतात
या नक्षत्राच्या महिला स्वतंत्र विचारांच्या तर असतातच मात्र, त्याचबरोबर त्या आपल्या कौटुंबिक मूल्यांना आणि नातेसंबंधांनाही तितकंच महत्त्व देतात. आपल्या पतीला फक्त मानसिक पाठिंबाच देत नाहीत तर प्रत्येक कठीण संकटात त्यांच्याबरोबर ढाल बनून उभ्या असतात.
प्रेम आणि समर्पण
स्वाती नक्षत्राच्या महिला मौन धारण करणाऱ्या असतात. त्यांचं आपल्या कामावर तसेच, पतीवर नितांत प्रेम असतं. यांचा स्वभाव कधीच आक्रमक नसतो. त्यामुळे ज्यांच्याशी यांचा विवाह होतो त्यांच्या वैवाहिक जीवनात शांतता टिकून राहते.
नवऱ्याला यशस्वी बनवण्यात योगदान
स्वाती नक्षत्रातील महिलांचा पतीच्या यशात देखील महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असतो. कारण या महिला प्रेरणा, स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जेचं स्त्रोत मानल्या जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















