Monthly Horoscope July 2025 : जुलै महिन्यात तब्बल 6 ग्रहांचं एकापाठोपाठ संक्रमण; 'या' 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, राजासारखं आयुष्य जगाल
Monthly Horoscope July 2025 : जुलै महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. यामुळे 5 राशींच्या नशिबाचे दार उघडणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Monthly Horoscope July 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलैचा महिना (Monthly Horoscope) फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. यामुळे 5 राशींच्या नशिबाचे दार उघडणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
2025 वर्षाचा सातवा महिना म्हणजेच जुलै महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. 9 जुलै रोजी गुरुचा उदय होईल, तर 13 जुलै रोजी शनी मीन राशीत वक्री होतील. 16 जुलै रोजी सूर्याचं संक्रमण होऊन कर्क राशीत प्रवेश होणार आहे. 18 जुलै रोजी बुध ग्रहाचं संक्रमण होऊन कर्क राशीत येतील तर, 24 जुलै रोजी याच राशीत अस्त होणार आहे. 26 जुलै रोजी शुक्र ग्रहाचं संक्रमण होऊन मिथुन राशीत प्रवेश होईल तर, 28 जुलै रोजी मंगळ ग्रहाचं संक्रमण होऊन कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतील.
मेष राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना करिअरच्या दृष्टीने फार चांगला असणार आहे. या काळात परदेशात नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमचे खर्च कमी झाल्याने बचतीसाठी अनेक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
जुलै महिन्याची सुरुवात सूर्य, गुरु आणि बुध ग्रहाची मिथुन राशीत होणार आहे. यामुळे बुधादित्य योग तसेच, गुरु आदित्य योग जुळून येणार आहे. या काळात तुम्हाला अप्रत्यक्षरित्या धनलाभ होईल. तसेच, प्रमोशन मिळण्याची देखील संधी आहे. तुमच्या कामातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला असणार आहे. या काळात प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासमोर चालून येतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मित्र-मैत्रीणींबरोबर तुमचे संबंध चांगले असतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना फार खास असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमच्या कामकाजात तुम्ही नवीन योजना राबवू शकता. तुमचं वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा चांगलं राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी जुलैचा महिना प्रमोशन, पगारवाढ आणि प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येणार आहे. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















