Astro Tips : पाळीव प्राणी बदलू शकतात तुमचं भाग्य; जाणून घ्या राशीनुसार कोणता पाळीव प्राणी पाळणं शुभ?
Astrology Tips : ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घरात येणारा पाळीव प्राणी घर, कुटुंब आणि आपल्या वैयक्तिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडतो.
Astrology Tips : खरंतर आपल्यापैकी असे बरेचजण आहेत ज्यांना प्राण्याप्रती विशेष प्रेम आहे. कुत्रा (Dog), मांजर, कासव, ससा, पोपट यांसारखे प्राणी-पक्षी (Animal) तर अनेकजण घरात हमखास ठेवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरात कोणता पाळीव प्राणी असावा याबद्दल अनेकांचे मतभेद असतात. आणि अर्थात हा निर्णय झटपट घेता येत नाही. कारण घरात येणारा पाळीव प्राणी घर, कुटुंब आणि आपल्या वैयक्तिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडतो.
ज्योतिष शास्त्रात या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे तर जाणून घेऊयात ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमच्या राशीनुसार कोणता पाळीव प्राणी पाळणं शुभ आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीचे लोक आत्मविश्वासू, प्रेरणादायी आणि आशावादी असतात. या लोकांमध्ये भयंकर ऊर्जा असते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी जर्मन शेफर्ड, डोबरमॅन यांसारखे श्वान पाळावेत.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीचे लोक हे आपल्या निर्भरतेसाठी ओळखले जातात. या राशीचे लोक इतरांवर निर्भर असतात तसेच स्वभावाने आळशी असतात. त्यामुळे त्यांनी मांजर पाळावी. मांजरीचा स्वभाव देखील सुस्त असल्या कारणाने तुम्ही घरात ती पाळू शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव मिश्कील आणि उत्साही असतो. त्यांना जीवनात सतत बदल हवे असतात. त्यांना लोकांशी मुक्तपणे संवाद साधायला आवडतो. स्वतंत्र व्यक्तिमत्व हा तर यांचा गुणच आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी घरात पोपट पाळणं शुभ ठरु शकतं.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीचे लोक संरक्षणात्मक, संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण असतात. हे लोक इतरांची फार काळजी करतात. कुटुंबाचं सुख यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी केस आणि पंख असलेला पाळीव प्राणी पाळावा. जो इतरांप्रमाणे तुम्हालाही जवळ घेईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचे लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी ओळखले जातात. तसेच, हे लोक महत्त्वाकांक्षी, अहंकारी आणि आत्मविश्वासू असतात. पाळीव प्राण्याच्या रुपात तुम्ही कोणत्याही प्रकारची मांजर किंवा घोडा पाळू शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीचे लोक तत्त्वनिष्ठ आणि मदतीसाठी नेहमी हात पुढे करणारे असतात. पण तरी ते आनंदी नसतात. तसेच, हे लोक एकटं राहणं पसंत करतात. या राशीचे लोक मासे पाळू शकतात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीचे लोक फार रोमॅंटिक असतात. हे लोक मित्रता आणि शांतीसाठी ओळखले जातात. त्यामुळे या राशीचे लोक लव्हबर्ड्स पाळू शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीचे लोक फार चपळ असतात. ते भयंकर उत्साही आणि आत्मविश्वासू असतात. त्यामुळे तुम्ही घरात ससा पाळणं अत्यंत शुभ ठरु शकतं.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीचे लोक फार मोकळ्या विचारांचे असतात. या राशीचं वैशिष्ट्य म्हणजे यांना बंधनात राहायला आवडत नाही. त्यामुळे या राशीसाठी घोडा पाळणं शुभ ठरु शकतं.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीचे लोक फार मेहनती असतात. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा ते गांभीर्याने विचार करतात. हे लोक वर्कोहोलिक असल्यामुळे यांना घरात पाळीव प्राण्याची गरज असू शकते. अशा वेळी तुम्ही घरात श्वान पाळू शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीचे लोक फार रोमॅंटिक आणि बुद्धीवादी असतात. या राशीच्या लोकांचं कलेवर फार प्रेम असतं. त्यामुळे या राशीचे लोक एखादा पक्षी घरात पाळू शकतात.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीचे लोक चतुर, रचनात्मक आणि सहानुभूतीपूर्वक असतात. मीन राशीचे लोक पाळीव प्राण्याच्या रुपात ससा घरी पाळू शकतात. तसेच, मासे देखील पाळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: