Shani Gochar 2024 : वर्षाच्या शेवटी शनीची बदलतेय चाल; 27 डिसेंबरपासून 'या' 3 राशींवर नसणार शनीचं सावट, हातातून गेलेला पैसा पुन्हा येणार
Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी शनी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. आपल्याला माहीतच आहे की, शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो.
ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी शनी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत. त्यामुळे शनीच्या राशी परिवर्तनाचा 3 राशींवर चांगला परिणाम होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या काळात शनीदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. त्यामुळे तुमच्या आर्थिक संपत्तीत देखील वाढ होईल. तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. धनलाभाचे अनेक नवीन स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुमचे आरोग्यही ठणठणीत राहील. तसेच, तुमच्या हातातून गेलेला पैसा तुम्हाला पुन्हा मिळेल त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ ही शुक्र ग्रहाची रास आहे. यामध्ये शनी उच्च स्थानी असल्यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतील. तुमच्या भौतिक सुख-सुविधेत चांगली वाढ झालेली दिसेल.तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक मोठा होईल. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात तुमच्यावर धनवर्षाव होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ रास ही शनीची मूळ रास आहे. त्यामुळे शनीच्या राशी परिवर्तनाच्या काळात कुंभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल. तुमच्या व्यवसायात नवीन यंत्रांचा वापर केला जात असल्याने तुमचे काम पटापट पूर्ण होईल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर राशी परिवर्तनाचा हा काळ चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: