Astrology : आज अधि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींवर असणार शनीदेवाचं राज्य, मागाल ती इच्छा होईल पूर्ण
Astrology Panchang Yog 17 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 17 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 17 मे 2025 म्हणजेच आजचा वार शनिवार. आजचा दिवस हा कर्मफळदाता शनीला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी ज्येष्ठ कृष्ण पंचमी आणि पूर्वाषाढा नक्षत्रचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचबरोबर, आज अधि योगसह अनेक शुभ योग जुळून आल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व खास आहे. आजच्या शुभ राशींना इच्छित फळ मिळेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. तसेच, कोणतंही काम करताना तुम्ही समजूतदारीने कराल. आज तुमच्या कामाचं कौतुक देखील केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्ही कोणतंही काम करताना भावनिक विचार न करता बुद्धीने विचार कराल. यामुळे तुमचं कोणतं नुकसानही होणार नाही. तसेच, आज तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी प्राप्त होतील. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांवर आज शनिदेवाची कृपा बरसणार आहे. आज कोणंतही काम करताना साहस आणि धैर्याने काम करणं गरजेचं आहे. तसेच, आज तुम्हाला करिअरचे वेगळे मार्ग सापडतील. तुमचं मनोबल वाढेल. तुमचे पाय खेचणारेही बरेच असतील. मात्र, शनीदेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या कारभारात चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. कामाच्या ठिाकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. संपत्तीची भरभराट होईल. मात्र, कोणावर लगेच विश्वास ठेवू नका.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
आज तुम्हाला अप्रत्यक्षपणे धनलाभ होईल. शनीदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, लवकरच तुमचे परदेशात जाण्याचे योग जुळून येणार आहेत. नातेसंबंध घट्ट होताना दिसतील. एकमेकांच्या भावनांचा आदर कराल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















