Astrology : आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जुळून आला सौभाग्य योग; मेषसह 'या' 5 राशींवर असणार बाप्पाचा आशीर्वाद, उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार
Astrology Panchang Yog 17 January 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशींच्या लोकांवर बाप्पाची सदैव कृपा राहणार आहे.
Astrology Panchang Yog 17 January 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 17 जानेवारी म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस खास आहे कारण आज नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी (Sankasht Chaturthi) आहे. तसेच, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज सौभाग्यासह अनफा योगाचा (Yog) शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशींच्या लोकांवर बाप्पाची सदैव कृपा राहणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज बाप्पाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, समाजातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या कलात्मक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. आज कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. आरोग्यात सुधारणा दिसेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल. जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज देवी लक्षम्ीची तुमच्यावर चांगली कृपा असेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच, धार्मिक कार्यात तुम्हाला सहभागी होता येईल. लवकरच तुम्हाला धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. व्यवसायात लवकरच मोठी डील मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आज भगवान गणेशाची विशेष कृपा असणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चांगला विकास झालेला दिसेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जाईल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :