Astrology : आज जुळून आलेल्या मालव्य राजयोगाचा 'या' 5 राशींना मिळणार लाभ; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धीत होणार वाढ
Astrology Panchang Yog 11 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 11 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 11 एप्रिलचा म्हणजेच शुक्रवार आहे. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी शुक्र ग्रहाची उत्तम स्थिती आहे. शुक्र ग्रहाने गुरुच्या राशीत संक्रमण केलं आहे. त्यामुळे परिवर्तन योग (Yog) जुळून आला आहे. तसेच, आजच्या दिवशी मालव्य राजयोगसुद्धा जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार असणार आहे. आजच्या शुभ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज दिवसभर तुम्ही उत्साही असाल. तसेच, तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, व्यवहारातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळणार आहे. तुमच्या बुद्धीचा चांगला विकास होईल. तसेच, तुम्हाला तुमच्या कामकाजात चांगला लाभ मिळेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला विस्तार होईल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. राजकीय क्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होईल. जर तुम्हाला नवीन वस्तची खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुम्हाला प्रॉपर्टीशी संबंधित चांगली वार्ता मिळू शकते. परदेशी यात्रेला जाण्याचे शुभ योग जुळून येणार आहेत. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. जर तुम्हाला एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. यासाठी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तसेच, तुम्हाला मित्रांच्या सहकार्याने लाभ मिळेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक गोष्टी घडतील. आनंदी वातावरणात राहाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:















