(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज शनि शश योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींना शनिच्या कृपेने जबरदस्त लाभ, सगळीकडून पैसा येणार
Panchang 8 June 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज शनीची कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 8 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, शनिवार, 8 जून रोजी शनिदेव त्याच्या मूळ त्रिकोण राशीत, म्हणजेच कुंभ राशीत आहे, त्यामुळे शनि शश राजयोग तयार होत आहे. आज चंद्र मिथुन राशीत असणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी शनि शश योग, गुरु आदित्य योग, वृद्धी योग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल आणि ते स्वतःला सिद्ध करण्यातही यशस्वी होतील. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल. नोकरदार लोक करिअरमध्ये चांगली प्रगती करतील, तुम्हाला उत्पन्न वाढीसह नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. आज व्यवसायिकांना परदेशात एखाद्या व्यवसायात भागीदारी करण्याची संधी मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहील आणि ते एकमेकांना समजून घेऊन काम करतील, त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे कमी होतील.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज शनिदेवाच्या कृपेने वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल. आज तुम्हाला अधिकाधिक धन मिळवण्यातही यश मिळेल. लोककल्याणाच्या कामात पुढे सरसावाल, अनेक प्रभावशाली लोकांशी तुमची ओळखही वाढेल. नोकरदार लोकांना कामावर त्यांच्या पात्रतेनुसार काम मिळाल्याने ते खूश होतील आणि वरिष्ठ सदस्यही तुमच्या कामावर खूश होतील. व्यापारी प्रतिस्पर्ध्यांना टफ फाईट देतील. खूप दिवसांनी तुम्हाला तुमच्या खास मित्रांसोबत मजा करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे तुमचं मनही हलकं होईल. तुम्ही सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि तुमच्या भावा-बहिणींशी तुमची जवळीक वाढेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तुम्हाला प्रत्येक पावलावर नशीब साथ देईल. आत्मविश्वास वाढल्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना आज त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळाल्याने खूप आनंद होईल. नोकरदार लोक त्यांच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा वापर करून अधिकारी आणि सहकाऱ्यांवर प्रभाव पाडू शकतील, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची वाह वाह होईल. आज शनिदेवाच्या आशीर्वादाने व्यापारी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येतील. आज तुम्ही व्यवसाय विस्ताराचं नियोजनही कराल. कौटुंबिक जीवन आनंदाचं असेल.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. धनु राशीच्या लोकांचं सर्व लक्ष भविष्य घडवण्यावर असेल. आज नशीब तुम्हाला करिअर आणि चांगले पैसे मिळवून देईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदाराशी प्रेमळ वाद चालू राहतील आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते दृढ राहील. आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्याही मजबूत असाल. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुम्ही पैसे कमावण्यासाठी तुमच्या कौशल्याचा वापर कराल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली प्रगती होईल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक अर्थाने खास असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज अचानक नफा मिळाल्यास खूप आनंद होईल. गुंतवणुकीशी संबंधित काही बाबींमध्ये तुमची आवडही वाढेल. तुम्ही धर्मादाय कार्यात सक्रिय सहभाग घ्याल आणि सामाजिक कल्याणासाठी अनेक कामं कराल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून त्यांच्या वरिष्ठांना चकित करतील, तुम्हाला कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या मुलावर काही जबाबदाऱ्या दिल्या असतील तर ते त्या चांगल्यारितीने पाळतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात तुम्हाला कोणत्याही विषयाबद्दल तणाव वाटत असेल तर तो आज दूर होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: