एक्स्प्लोर

Astrology : आज सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; मेष राशीसह 'या' 5 राशींच्या धन-संपत्तीत होणार वाढ, राशीनुसार करा'हे' अचूक उपाय

Panchang 30 March 2024 : आज, म्हणजेच 30 मार्च रोजी रवि योग, सिद्धी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस मेष, वृषभसह 5 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच, शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे, त्यामुळे आज या 5 राशींवर शनिदेवाची देखील कृपा राहील.

Astrology Today 30 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, शनिवार, 30 मार्चला चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून या दिवशी सिद्धी योग, रवि योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज शनिदेवाच्या कृपेने जीवनातील सर्व सुखसोयींचा आनंद लुटता येईल, आणि तुम्हाला काही नवीन काम सुरू करण्याची संधीही मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांच्या मेहनतीला फळ मिळेल आणि अधिकारीही तुमच्या कामावर खूप खुश होतील. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही आज तुमच्या पालकांचा सल्ला घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य नोकरीसाठी घरापासून दूर जाऊ शकतो. तुम्ही भाऊ-बहिणींसोबत चांगला वेळ घालवाल आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घ्याल. जर तुम्हाला नवीन घर किंवा गाडी घ्यायची असेल तर शनिदेवाच्या कृपेने तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते.

शनिवारचा उपाय : शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'ओम प्राण प्रीण प्राण स: शनिश्चराय नमः' या मंत्राचा तीन वेळा जप करा.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज चांगली कमाई करतील आणि कमावलेल्या पैशांची गुंतवणूक देखील योग्य पद्धतीने कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेलं वचन तुम्ही सहजपणे पूर्ण कराल आणि तुम्ही तुमच्या वडिलांसाठी खास भेटवस्तू देखील खरेदी करू शकता. स्वतःचा व्यवसाय करणारे लोक आज चांगलं काम करतील, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगला नफा मिळेल. विवाहित लोकांमध्ये प्रेम राहील आणि मुलांकडून काही चांगली बातमी देखील मिळू शकते. सासरच्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला त्यांची मदतही मिळेल. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल आणि इतरांना मदत करण्यासही तुम्ही तयार असाल.

शनिवारचा उपाय : शत्रू आणि अडथळे दूर करण्यासाठी भाकरीवर मोहरीचे तेल टाकून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. सिंह राशीचे लोक आज गुंतवणुकीसाठी किंवा काही जमीन खरेदीसाठी त्यांचे पैसे वापरू शकतात आणि संपत्ती जमवू शकतात. आज तुमचा दिवस आनंदाचा असेल,  शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल. तुमचं अडकलेलं कोणतंही महत्त्वाचं काम मित्राच्या मदतीने पूर्ण होऊ शकतं. तुमच्या आई-वडिलांचं आरोग्य या काळात चांगलं राहील आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत राहतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुम्ही नवीन व्यवसायात गुंतवणूकही करू शकता. नोकरी करणारे आज अचानक मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात.

शनिवारचा उपाय : कामातील अडथळे दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडावर पाणी टाकून चारमुखी दिवा लावा. तसेच शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ 'ओम शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करत राहा .

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. मकर राशीचे लोक आज काही थोर व्यक्तींना भेटू शकतात. विद्यार्थ्यांची आज अभ्यासाच्या ताणातून सुटका होईल. तुम्हाला भागीदारीत कोणतंही काम करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात बराच काळ काही अडथळे येत असतील तर आज तुमची त्यातून सुटका होईल. नोकरी करणाऱ्यांचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, जे कार्यालयीन कामात फायदेशीर ठरतील. तुम्हाला मित्रांसोबत एखाद्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल आणि तुम्ही नवीन मित्रही बनवाल. जे लोक प्रेमसंबंधांत आहेत ते आज जोडीदारासोबत डिनरसाठी बाहेर जाऊ शकतात.

शनिवारचा उपाय : मानसिक शांतीसाठी दर शनिवारी पीठ, काळे तीळ आणि साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. तसेच, मोहरीच्या तेलापासून बनवलेल्या वस्तू गरीब आणि गरजूंना खायला द्या आणि त्यांची सेवा करा.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. मीन राशीच्या लोकांना आज पैसा मिळण्याची शक्यता आहे आणि या राशीचे बरेच लोक त्यांचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम देखील लावू शकतात. कौटुंबिक नात्यात सुरू असलेला कलह आज संवादातून सोडवा. नोकरदार लोकांना आज पदोन्नतीशी संबंधित काही बातमी मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या जोडीदाराने केलेली एखादी गोष्ट तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील प्रेम आणखी वाढेल.

शनिवारचा उपाय : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी एका भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात एक नाणं टाका आणि त्यात तुमचं प्रतिबिंब पहा. त्यानंतर ते तेल गरीब व्यक्तीला द्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात वाटीत ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Numerology : प्रचंड हुशार आणि चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जिथे जातात तिथे होतं यांचं कौतुक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील', पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Embed widget