
Astrology : आज रुचक राजयोगासह जुळून आले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींवर राहणार महादेवाची विशेष कृपा, होणार धनलाभ
Panchang 3 June 2024 : आज सोवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज भोलेनाथांची कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Panchang 3 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, सोमवार, 3 जून रोजी मंगळ स्वतःच्या राशीत मेष राशीत स्थित असेल, ज्यामुळे रुचक राजयोगाची निर्मिती होईल. तर आज चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी रुचक राजयोगासोबतच सौभाग्य योग, शोभन योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. आज तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नही वाढेल. आज एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुमच्या मनावरील ओझेही हलके होईल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल आणि तुमचे सर्व कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांना नवीन डील मिळू शकते. कौटुंबिक जीवन सुखाचं असेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यासंंबंधी योजनांवर चर्चा कराल.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी कळू शकते. आज भरपूर पैसे कमावण्याच्या संधी देखील तुम्हाला मिळतील. तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते आणि त्यासंबंधीची सर्व कामं सहज पूर्ण होतील. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज होत असतील तर आज संवादातून वाद सोडवाल. नोकरी करणारे आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात, जिथे त्यांनी यश मिळेल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल आणि जुन्या आठवणी ताज्या कराल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित कामं सहज पूर्ण होतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल, तर आज तुमचं आरोग्य सुधारेल आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त राहाल. कौटुंबिक जीवनात खूप प्रेम आणि आनंद असेल. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा अनुकूल परतावा मिळेल आणि तुम्ही भविष्यासाठीही गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल तर आज ती देखील संपेल आणि तुम्ही सर्व कामं पूर्ण करू शकाल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला काही चांगली बातमी ऐकू येईल आणि धार्मिक कार्यात भाग घेतल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील, ज्यामुळे अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील आणि ते इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात. घर असो वा बाहेर, तुम्ही जवळच्या लोकांचा विश्वास सहज जिंकू शकाल आणि इतरांना मदत करण्यासही तयार असाल. तुम्हाला आज तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या नातेवाईकाच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल, जिथे खूप आदरातिथ्य होईल.
मीन रास (Pisces)
आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मीन राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे आणि सर्व प्रकारचे त्रास आणि समस्या देखील दूर होतील, ज्यामुळे तुमच्या जीवनातील तणाव दूर होईल. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना आजपासून करिअर सुरू करण्याची संधी मिळेल. उद्योगपती स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जातील आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा त्यांना पुरेपूर लाभ मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे. दिवसातील काही वेळ तुम्ही तुमच्या पालकांची सेवा करण्यात घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आज दुसऱ्या कंपनीकडून जॉईनिंग लेटर मिळू शकतं, ज्यामुळे तुमचं करिअर चांगलं होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
