एक्स्प्लोर

Horoscope Today 3 June 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 3 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

 

Horoscope Today 3 June 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. 

व्यवसाय (Business) - आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.

युवक (Youth) - तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. 

व्यापार (Business) - आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. 

तरूण (Youth) - मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - सरकारी खात्याशी संबंधित आहेत किंवा कोणत्याही सरकारी पदावर काम करतात, त्यांना बदलीचे पत्र मिळू शकते, ज्यामध्ये त्यांना त्यांचे इच्छित स्थानही मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी त्यांच्या ग्रहांचा विचार करून जमिनीत गुंतवणूक करावी, त्यांना त्यात मोठा नफा मिळू शकतो. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, जर तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही छोटी गुंतवणूक करू शकता.

तरुण (Youth) -  तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाइकांशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे तुमचे नाते अधिक चांगले होईल

आरोग्य (Health) - पाठदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. यामुळे तुम्हाला नियमितपणे योगा करावा लागू शकतो

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) -  तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडत असताना तुमचा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवावा. तुमच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी गहाळ होण्याची शक्यता आहे.  

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. त्यांना जास्त नफा मिळेल आणि तोटा नाही. तुमचा दिवस चांगला जाईल. 

तरुण (Youth) -  क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले पाहिजे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना काही धान्य दान देखील करू शकता. तुमच्या विनाकारण बोलण्याने तुमच्या घरातील वातावरण बिघडू शकते 

आरोग्य (Health) -   त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक वापरण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - प्रामाणिकपणे काम करा. कामात हलगर्जीपणा करु नका.

व्यवसाय (Business) - पूर्वनियोजित योजना अंमलात आणू शकता. जे तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

तरुण (Youth) -  तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात, त्यांचा सल्लाही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

आरोग्य (Health) - आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, तुमचे आरोग्य बिघडू शकते. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, परंतु तुम्ही त्यातून सुटू शकता आणि तुमचा विरोधक स्वतः त्या कटात अडकू शकतो.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगला होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. आज तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण त्यावर लवकरच उपाय सापडतील.

विद्यार्थी (Student) - तरुण आपल्या कौशल्याने काही मोठं काम करून यश मिळवू शकतात, त्यात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल.

आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेत राहा, अन्यथा जुने आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा आणि शक्य तितका पौष्टिक आहार घ्या.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यामुळे काम थांबेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगलं काम कराल, तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. शाळेला सुट्टी असल्याने मौजमजा करण्यात तुम्ही दिवस घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत होळीच्या तयारीत व्यस्त असाल. तुम्ही तुमचा सण उत्साहात साजरा कराल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, शोभन योग, बुधादित्य योग तयार झाल्यामुळे व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, तुमची नियोजित कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीने काम कराल, तुमचे बॉस तुमच्यावर खूश असतील आणि ते तुमचा पगारही वाढवू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.  

कौटुंबिक (Family) - तुमच्या मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. तुमच्या जीवनात यश मिळवण्यासाठी अनावश्यक भांडणांपासून दूर राहा, तुमचं तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून भांडण होऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला कामावर काही नवीन संधी मिळतील ऑफिसमध्ये तुम्ही नाव कमवाल. लक्ष देऊन काम करत राहा.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा खूप विस्तार करू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कुणालाही चुकीचं बोलू नका. आज तुम्ही तुमच्या मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यात यशस्वी व्हाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांना त्यांचं खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याची मदत घ्यावी लागेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. तुम्हाला डॉक्टरकडेही जावं लागू शकतं.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या ऑफिसचं वातावरण आज तुम्हाला आज खूप अडचणीत टाकू शकतं, परंतु तुमच्या हुशारीने तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकाल. आज तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेचा वापर कराल. बोलताना थोडी सावधगिरी बाळगा आणि पैशाच्या व्यवहारातही थोडं सावध राहा, अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नशिबामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. व्यवसायात तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती नीट हाताळाल.

विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हाड किंवा अंग दुखण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खा, तुमचं आरोग्य सुधारेल. .

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Monthly Horoscope June 2024 : जून महिना तुमच्यासाठी कसा राहील? नशिबाची कितपत साथ मिळणार? जाणून घ्या सर्व 12 राशींचे मासिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Embed widget