एक्स्प्लोर

Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ

Panchang 25 December 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी लाभ योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 25 December 2024 : आज बुधवार, 25 डिसेंबर रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे मंगळाचं चंद्रावर चतुर्थ स्थान असल्यामुळे लाभ योग तयार होत आहे. तसेच आज नाताळचा दिवसही साजरा करण्यात येणार आहे. नाताळच्या दिवशी अतिगंड योग, लाभ योग आणि चित्रा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष (Aries Today Horoscope)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज मेष राशीच्या लोकांच्या सर्व चिंता आणि कामातील अडथळे हळूहळू दूर होताना दिसतील आणि ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी होतील. कौटुंबिक व्यवसायासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता असेल, आज तुम्हाला त्यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज, नोकरदार लोक त्यांचं उत्पन्न वाढवण्यावर आणि त्यांचं करियर मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतील. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत काही वेळ घालवाल.

कन्या (Virgo Today Horoscope)

आज कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. कन्या राशीचे लोक आज सकारात्मक उर्जेने भरलेले असतील आणि त्यांच्या बोलण्याने आजूबाजूचे वातावरण प्रसन्न ठेवतील. आज तुम्हाला सर्वत्र ख्रिसमस डेचा उत्साह दिसेल. तुम्हाला भविष्य डोळ्यासमोर ठेवून चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल आणि तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्नही बाप्पाच्या कृपेने पूर्ण होईल. आज नाताळच्या निमित्ताने व्यापारी नवीन योजना राबवतील, ज्यामुळे त्यांना चांगला नफा कमवण्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल.

वृश्चिक (Scorpio Today Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक आज ख्रिसमसच्या निमित्ताने निवांत क्षणांचा आनंद घेतील आणि स्वतःसाठी ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकतील. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या मदतीने केलेल्या कामाचे शुभ फळ मिळेल आणि नवीन वर्षात तुम्ही संपूर्ण कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा बेतही कराल. कर्मचारी आज कार्यालयात सहकाऱ्यांसोबत ख्रिसमस पार्टीचा आनंद घेतील आणि कामे वेळेवर पूर्ण करतील. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर ते आज संपुष्टात येईल आणि दोघांमधील परस्पर प्रेमही दृढ होईल. 

धनु (Sagittarius Today Horoscope)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज वडिलोपार्जित मालमत्ता किंवा शेअर बाजारातून भरीव पैसे कमावण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आज नवीन संधी मिळू शकतात, ज्यामध्ये मित्रांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांची प्रगती पाहून आनंद होईल. आज नाताळच्या सुट्टीचा लाभ व्यापाऱ्यांना मिळणार आहे. आज तुम्ही भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल आणि प्रत्येकजण कामात एकमेकांना साथ देईल. संध्याकाळी, तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता, ज्याच्याकडून तुम्हाला काही महत्वाची माहिती देखील मिळेल.

मीन (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच 25 डिसेंबरचा दिवस शुभ आहे. मीन राशीचे लोक आज धार्मिक कार्यात रस घेतील. तरुण मंडळी आज ख्रिसमस पार्टी किंवा फंक्शनमध्ये एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील तर त्यांना त्यात यश मिळेल. तुमच्या भावाच्या मदतीने तुमचे महत्त्वाचे प्रलंबित काम आज पूर्ण होऊ शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांना आज उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology : यंदाचा नाताळ 3 राशींसाठी ठरणार खास; 25 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur News : तुळजानगरी भाविकांंनी गजबजली, सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक तुळजापुरात #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 25 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाTop 70 at 7AM Superfast 25 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
Embed widget