Astrology : आज द्विपुष्कर योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींना होणार डबल लाभ, नोकरी-व्यवसाय गाठणार आर्थिक उंची
Panchang 24 September 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी द्विपुष्कर योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 24 September 2024 : आज मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून या तिथीला सप्तमी तिथीचं श्राद्ध केलं जाईल. पितृ पक्षाच्या सातव्या दिवशी वरियान योग, द्विपुष्कर योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वृषभ राशीच्या लोकांना कौटुंबिक तणावातून आराम मिळेल. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, यातून तुमची संपत्ती वाढेल. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मिळालेल्या पैशाने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. जर तुमचे सासरच्या लोकांशी काही वाद होत असतील तर ते आज संपतील. संध्याकाळी मुलांसोबत तुमचा वेळ व्यतित होईल.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कर्क राशीचे लोक आज पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये असतील आणि रविवारी सुट्टीचा आनंद घेतील. या राशीचे लोक ज्यांना प्रवास, शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या नात्याला ओळख मिळेल. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक लाभ होईल. आज विद्यार्थ्यांना प्रत्येक पावलावर वडिलांची आणि शिक्षकांची साथ मिळेल. संध्याकाळी घरी विशेष पाहुण्यांचं आगमन होईल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज अत्यंत कठीण कामही पूर्ण मेहनतीने पूर्ण करतील. अडकलेले पैसे परत मिळाल्यावर आज तुम्हाला समाधान मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांमुळे घरातील वातावरण आनंददायी राहील. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा तुमचा प्लॅन असेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. तूळ राशीच्या लोकांवर आज बजरंगबलीचा आशीर्वाद असेल. आज नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढेल आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासावर केंद्रित होईल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज श्राद्धविधीमुळे धार्मिक वातावरण असेल आणि सर्व सदस्यही सहकार्य करतील. आज दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर आज ते तुम्हाला पूर्ण करता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :